मुंबई : भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारी स्टार खेळाडू पीव्ही सिंधू हिला नुकताच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल हिलाही राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार मिळाला. मात्र पीव्ही सिंधूचा एका व्हिडिओने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधत आहे.
दरम्यान पीव्ही सिंधू पारंपारिक ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत असून ‘सीके द फर्स्ट’ अल्बमचे प्रेमगीत वाजत होते. त्यावर पीव्ही सिंधूने मस्त डान्स केला. तिच्या या व्हिडीओला लाखों व्ह्यूज आणि भरपूर कमेंट्स आल्या आहेत. नेटकऱ्यांनी तिच्या डान्सचे आणि लूकचे खूप कौतुक करत आहेत. पीव्ही सिंधूचा लूक पाहून अनेकांनी तिला राणी म्हटले. कमेंट्स केलेल्यामध्ये अनेक सेलिब्रिटींचाही समावेश आहे. मॉडेल लक्ष्मी मंचूने पीव्ही सिंधूचे वर्णन अतिशय क्यूट असल्याचे सांगितले. पीव्ही सिंधूनेही तिचे वेगळ्या पद्धतीने आभार मानले.
https://www.instagram.com/reel/CV-HAB7gmZN/?utm_medium=copy_link
या व्हिडिओवर ‘मॅडम तुम्ही खूप सुंदर दिसत आहात.’,भारतातील सर्वात सुंदर मुलगी असे कमेंटमध्ये म्हटले आहे. तर काही लोकांनी मात्र सिंधूला तिच्या खेळावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. ‘मॅडम कृपया तुमच्या प्रशिक्षणावर आणि ट्रेनिंग लक्ष केंद्रित करा.’, ‘मॅडम सुपर. तुम्ही खूप सुंदर दिसत आहात असे नमूद केले आहे. पीव्ही सिंधूने २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये महिला एकेरीत रौप्य पदक जिंकले होते. यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिला अंतिम फेरी गाठता आली नाही, पण तिने कांस्यपदक जिंकले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मन उडू उडू झालं’ फेम अजिंक्य राऊतच्या गाडीला गंभीर अपघात
- प्रकृती बिघडल्याने रामराजे नाईक निंबाळकर रुग्णालयात दाखल
- अंडरवर्ल्ड संबंधाच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना मलिकांनी केला गोपीनाथ मुंडे आणि दाऊदचा नामोल्लेख, म्हणाले..
- उद्या सकाळी 10 वाजता हायड्रोजन बॉम्ब फोडणार- नवाब मलिक
- ‘हे तर ब्रम्हांडातल्या बेस्ट मुख्यमंत्र्यांचे हे प्रगती पुस्तक’, भाजपची बोचरी टीका


