कोल्हापूर : भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर हे गेल्या वर्षीपासून चांगलेच चर्चेत असतात. पवार कुटुंबियांसह महाविकास आघाडीवर सातत्याने केलेली बोचरी टीका, आंदोलने यामुळे अनेक वाद निर्माण झाले आहेत. सोलापुरात घोंगडी बैठकीत बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली होती. शरद पवार हे मोठे नेते नाहीत, ते फक्त साडेतीन जिल्ह्यांच्या पक्षाचे स्वामी आहेत, अशी टीका पडळकर यांनी केली होती.
यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस देखील आक्रमक झाली असून पडळकर विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना चांगलाच रंगला आहे. पडळकर यांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी चोख प्रत्युत्तर दिलंय. यावेळी मंत्री महोदयांनी पडळकरांना ठेवणीतल्या अशा शिव्या देऊ की त्यांना रात्रभर झोप येणार नाही, असं वादग्रस्त विधान केलं आहे.
‘मी त्यांना या निमित्ताने इतकंच सांगेल की शिव्यांची मालिका आता सुरु झाली आहे. आता आम्ही अशा ठेवणीतील शिव्या देऊ की त्यांना रात्रभर झोपा येणार नाही. रात्र जागून काढाव्या लागतील. अशा प्रकारची पद्धत या राज्यात सुरु झाली आहे. कायदा सुव्यवस्था देखील यामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. याला सर्वस्वी जबाबदार देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील असतील,’ असा इशारा देखील हसन मुश्रीफ यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- कोरोनाच्या दोन लाटेमधील काळ हा संयम आणि शिस्तीसाठी महत्त्वाचा – उद्धव ठाकरे
- मोदींच्या मंत्रिमंडळात मोठी उलथापालथ ; प्रकाश जावडेकरांनी सुद्धा दिला राजीनामा
- भाजपमध्ये पक्ष सदस्य होण्यापूर्वी आयारामांना मंत्रीपदाची संधी? चाकणकरांची टीका
- अखेर विद्यापीठातील बीकॉमच्या विद्यार्थ्यांना मिळणार न्याय, दोषी कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाईचे आदेश!
- ‘भाजपने ईडी आणि सीबीआयला कामाला ठेवलंय, सत्ता मिळवण्यासाठी ते कोणत्याही टोकाला जातील’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

