कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील २०१९ च्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी तसेच शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी करावी, अशी मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्तांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. दसरा चौकातून सुरु झालेल्या या मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभेत रुपांतर झाले.
यावेळी माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणतात मोर्चे काढू नका, मग काय भजन करायचं का? शेतकरी नुकसान भरपाईसाठी तडफडत असताना सरकार मात्र काहीही गरज नाही अशा भूमिकेत आहे.
‘मोर्चा काढणार म्हंटल्यावर अनेकांनी टीका केली की, राजू शेट्टी बदलले, शेट्टींनी हवा बदलली. पण पूर येऊन १ महिना उलटून गेला तरी एकालाही अद्याप मदत मिळाली नाही. गेली २५ वर्षे चळवळीत काम करतोय. ४ पूर पाहिले प्रत्येकवेळी तातडीने मदत मिळाली. २०१९ चा पूर सर्वात मोठा होता. तुम्ही आमचा अपेक्षाभंग केलाय’, असा आरोपही यावेळी राजू शेट्टींनी केला आहे.
शेट्टी यांनी २०१९ साली मिळालेल्या मदतीचा देखील यावेळी दाखला दिला. राज्य सरकारने निर्णय नाही बदलला तर चिखलीतून नरसोबावाडीच्या दिशेने जाऊन जलसमाधी घेणार. जगण्यात काही अर्थ राहिला नाही, तोडगा नाही निघाला तर सामूहिक जलसमाधी नक्की आहे, असा इशारा राजू शेट्टी यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘दहीहंडीला परवानगी द्या नाहीतर आंदोलन करु’; आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला इशारा
- ‘दहीहंडीसाठी कोरोनाचा बाऊ कशाला? ; दहीहंडी साजरी करणाऱ्या मंडळांच्या पाठीशी मनसे उभी राहणार’
- श्रुती मराठेचा साडीमधील सुंदर लुक चाहत्यांच्या पसंतीस
- आर माधवनच्या मुलाची निरज चोप्रासोबत होत आहे तुलना

