कोल्हापूर : हाडे गोठवणार्या कडाक्याच्या थंडीतही दिल्लीत आंदोलनात शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात आणि आंदोलन संपवावे, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. गडहिंग्लजमध्ये सलोखा परिषदेच्या वतीने आयोजित सर्वपक्षीय शेतकरी आंदोलनाला मंत्री मुश्रीफ यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. यावेळी मुश्रीफ यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली.
केंद्राने चर्चा न करता हा अन्यायकारक कायदा लागू केला असून, त्याविरोधात पंजाब व हरियाणातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. केंद्राने हे कायदे मागे घेऊन शेतकर्यांची हाक ऐकावी. एका बाजूला बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला हरताळ फासत शेतकरीविरोधी निर्णय घेणारे व आंदोलनाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसरीकडे मात्र ‘मन की बात’मधून मुक्त चिंतन करताना दिसत आहेत. अशावेळी पंतप्रधान मोदींना शेतकर्यांशी बोलायला मात्र अपमान वाटत आहे. असा घणाघात मुश्रीफ यांनी केला आहे.
दुसरीकडे, केंद्रातील मोदी सरकार ज्या शेतकर्यांच्या हितासाठी कायदे करीत असल्याचे भासवत आहे. ते कायदे जर शेतकर्यांना नकोच असतील तर ते कायदे करताच कशाला. भांडवलदारांच्या फायद्यासाठी शेतकर्यांना वेठीस धरणार असाल तर शेतकरी तुमचा ‘बाप’ आहे, लक्षता ठेवा, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली. ते सांगलीतील किसान समन्वय समितीच्या सभेत बोलत होते.
महत्वाच्या बातम्या
- ब्रिस्बेनला जाण्याची टीम इंडियाची का इच्छा नाही ? जाणून घ्या
- “कसोटीपूर्वी भारतीय संघावर दबाव आणण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे हे वाईट कृत्य”
- मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेल्या नव्या पाणीपुरवठा योजनेला सुरुहोण्यापूर्वीच घरघर
- गृहमंत्री अमित शाहांची खिल्ली उडवली म्हणून कॉमेडियनला खेचले पोलीस ठाण्यात
- ‘पंतने मला मिठी मारली नाही, हे सर्व माझ्याकडून उत्साहात सांगितले गेले’; चाहत्याचा खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
