पुणे : निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणासाठी जाहीर केलेला मदत तोकडी असल्याचं म्हणत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. यानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी फडणवीस यांच्या आरोपाला आपल्या खास शैलीत उत्तर दिलं आहे. काही प्रसारमाध्यमांनी केलेल्या सर्वेमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले. हे देवेंद्र फडणवीस यांना खटकल्यानेच त्यांनी ही टीका केल्याचा टोला मुश्रीफ यांनी लगावला. तसेच देवेंद्र फडणीस यांनी मनशांतीसाठी अध्यात्मिक पुस्तकं वाचावीत, असा सल्लाही दिला.
पंधरवड्यापूर्वी माझे मित्र देवेंद्र फडणवीस यांना ‘मौनम् सर्वार्थ साधनम्’, ‘मौन व्रतामुळे शांती लाभते’ आणि ‘प्रतिकूल परिस्थितीत अध्यात्म हाच उपाय’ अशी तीन महत्त्वाची पुस्तके वाचण्याचा सल्ला दिला होता. ज्यामुळे ते वैफल्यग्रस्त मनस्थितीतून बाहेर येऊन, त्यांचे मन:स्वास्थ्य ठीक राहील अशी अपेक्षा होती, पण त्यांनी ती पुस्तके वाचलेली दिसत नाहीत. त्यांनी माझा धुडकवला आहे. असा मिश्कील टोला हसन मुश्रीफ यांनी फडणवीसांना लगावला आहे.
सोनू सूद वरून राष्ट्रवादी आणि शिवसेना आमने-सामने…
कोकणात निसर्ग चक्रीवादळासाठी १०० कोटी रुपयांची मदत अतिशय तोकडी आहे. राज्य सरकारची अवस्था धोरण लकव्याची सुद्धा आहे, अशी टीका फडणवीस यांनी आज केलेली आहे. नुकसानीच्या दिवशीच मुख्यमंत्री ठाकरे यांनी पाहणी करून विजेचे ट्रान्सफॉर्मर आणि जनतेच्या अत्यावश्यक सेवांसाठी तात्काळ मदत म्हणून १०० कोटी रुपये जाहीर केले होते. तसेच तातडीने पंचनामे करू आणि जेवढे नुकसान झाले असेल ते सर्व नुकसान सरकार देण्याचा प्रयत्न करेल, असेही त्यांनी जाहीर केले होते. तरीही फडणवीस टीका करीत असून हा हास्यास्पद प्रकार असल्याचे देखील मुश्रीफ यावेळी म्हणाले.
फडणवीसांनी ‘मुंगेरी लाल’ प्रमाणं सत्तेची स्वप्न पाहू नयेत, अनिल देशमुखांची घणाघाती टीका


