Share

सोनू सूद वरून राष्ट्रवादी आणि शिवसेना आमने-सामने…

Published On: 

पुणे : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत अडकलेल्या मजूरांना गावी जाण्यासाठी मदत करणारा अभिनेता सोनू सूद याच्या कामाची प्रचंड चर्चा सुरु आहे. मात्र, शिवसेना नेते संजय राऊत यांनी सोनू सूदच्या एकूण कार्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सामनातील ‘रोखठोक’ या सदरात संजय राऊत यांनी सोनू सूदला दत्तक घेऊन भाजप नेते उत्तर भारतीय व्होटबँकेचे राजकारण करु पाहत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

या लेखात संजय राऊत यांनी म्हटले आहे की, लॉकडाऊन काळात सोनू सूद हा नवा महात्मा अचानक निर्माण झाला. सूद याने म्हणे लाखो मजुरांना त्यांच्या घरी परराज्यात पोहोचवले. म्हणजे केंद्र व राज्य सरकारने काहीच केले नाही. यानंतर राज्यपालांनी त्याला थेट राजभवनावर बोलावून त्याचे कौतुक केले. महाराष्ट्रातील अनेक संस्था, व्यक्ती, पोलीस, पालिका कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका आणि बँक कर्मचारी जीवावर उदार होऊन कोरोनाशी लढत आहेत. मात्र, सोशल मीडियावर त्यांचे कधी कौतुक झाले नाही. हा सगळा घटनाक्रम संशय निर्माण करणारा असल्याचे संजय राऊत यांनी म्हंटल आहे.

फडणवीसांनी ‘मुंगेरी लाल’ प्रमाणं सत्तेची स्वप्न पाहू नयेत, अनिल देशमुखांची घणाघाती टीका

यावर आता राज्याचे गृहमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “संजय राऊत यांचं विधान मी पाहिलं नाही. परंतु करोनाविरोधातील लढाईत सर्वांनी एकत्र येऊन काम करायला हवं. सोनू सूद यांचं कार्य चांगलं आहे. त्यांच मी अभिनंदन करतो,” असं म्हणत देशमुख यांनी सोनू सूदच्या कार्याची स्तुती केली आहे.

लॉकडाउन काळात इतर राज्यांत अडकलेल्या कामगारांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी गेल्या काही दिवसांत अनेक जणं पुढे येत होती. केंद्र सरकारने मजुरांसाठी विशेष श्रमिक एक्सप्रेस रेल्वे गाड्यांची सोय केली. याचसोबत राज्य सरकारही या कामगारांसाठी विशेष बस गाड्या चालवत होतं. मुंबईत बॉलिवूड अभिनेता सोनू सूदनेही या कामगारांना घरी पाठवण्याची जबाबदारी उचलली. गेल्या काही दिवसांत सोनूने कधी स्वतः पैसे खर्च करत तर कधी चॅरिटी ट्रस्टच्या माध्यमातून या कामगारांना बस, रेल्वे, विमानाने घरी पाठवलं. आतापर्यंत सोनूने कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, ओडीशा, देहारादून अशा विविध भागातील कामगारांना मदत केली आहे.

‘सोनू सूदने दुर्दैवी प्रसंगी मदत केली, तर त्यात चुकीचं काय?’

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!