🕒 1 min read
मुंबई : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री ‘कंगना रणावत’ आता तिच्या आणखी एका वक्तव्यामुळे चर्चेत अली आहे. आता कंगना नुकतीच मुंबई मध्ये परतली आहे. कंगना मुंबई मध्ये येताच तिच्यावर टीकेची झोड उठली आहे.
मुंबईत येताच कंगना सिद्धिविनायकाच्या दर्शनास गेली होती सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर कंगना रानौतने मोठ्या उत्साहात हसतखेळत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मला मुंबईत राहण्यासाठी केवळ गणपती बाप्पाच्या परवानगीची गरज आहे. मी इतर कोणाकडेही परवानगी मागितली नाही, असे सांगत कंगनाने शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला लगावला.
The amount of hostility I faced for standing up for my beloved city Mumbai baffled me, today I went to Mumba devi and Shri Siddhivinayak ji and got their blessings, I feel protected, loved and welcomed. Jai Hind Jai Maharashtra ???? pic.twitter.com/sxT583P5w2
— Kangana Ranaut (@KanganaTeam) December 29, 2020
“for standing up for my beloved city Mumbai “ ????????????
बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का हो भाऊ…????????????— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) December 29, 2020
दरम्यान, कंगनच्या या व्यक्त्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी ट्विट करत कंगनाला चांगलाच टोला लगावला आहे. ‘माझ्या लाडक्या मुंबईसाठी उभं राहिल्याबद्दल.’ बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का हो भाऊ.., असे खोचक ट्वीट उर्मिला यांनी केले. उर्मिला मातोंडकर यांच्या ट्विटला कंगनाने अजूनही प्रतिउत्तर दिले नाही. त्यांच्या या ट्विट नंतर कंगना काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रात रिपाइंचे 50 लाख सदस्य करा; रामदास आठवलेंचे कार्यकर्त्यांना आदेश
- महाआघाडी सरकारने महिलांच्या विषयात तरी राजकारण करू नये- भाजपा
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यावर अतिप्रसंगाचा गुन्हा मात्र अटक नाही; चित्रा वाघ यांचे गंभीर आरोप
- मुंबईतील शाळा-महाविद्यालयांबाबत महापालिकेने घेतला महत्वाचा निर्णय!
- ‘मुंबईत महापौर बनवायला काँग्रेसकडे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि काही मतदार शिल्लक राहिलेत का?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
