Share

शिवसेना खऱ्या हिंदुत्वपासून दूर जात आहे, त्यामुळे अनेक शिवसैनिक मनसेमध्ये येतील

Published On: 

मुंबई : ‘हिंदुत्वाचा पुरस्कार झाला पाहिजे.शिवसेना खऱ्या हिंदुत्वपासून दूर जात आहे, त्यामुळे अनेक शिवसैनिक मनसेमध्ये येतील, असे म्हणत हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. तसेच रावसाहेब दानवेचा जावई मनसेमध्ये गेला म्हणजे आता मनसे आणि भाजप एकत्र येईल, असं कुणी समजू नये, असंही हर्षवर्धन जाधव म्हणाले.

दरम्यान, आज राज ठाकरे यांच्या उपस्थितीत कृष्णकुंज निवासस्थानी कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि प्रकाश महाजन यांनी मनसेत प्रवेश केला आहे. तसेच जाधव आणि महाजन यांच्यासोबत नांदेडचे शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश कौटगे आणि माजी शहरप्रमुख सुहास दशरथे हेसुद्धा मनसेत प्रवेश केला. मनसेत पक्षप्रवेश केल्यानंतर हर्षवर्धन जाधव यांनी खैरेंवर निशाणा साधला आहे.

‘शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे कधीच आयुष्यात खासदार होणार नाहीत, हे मी लिहून देतो. मी त्यांना आधी सुद्धा बोललो, आता तुमचं वय झालंय तुम्ही निवृत्ती घ्यावी. शिवसेनेचं नेतेपद मिळेल त्यावर खूश राहावं.’माझ्यावर आणि माझ्या कुटुंबाबाबत घाणेरडी वक्तव्य करणे सोडावं. त्यात त्यांची पातळी दिसते. असेही ते यावेळी म्हणाले. गेल्या काही वर्षांमध्ये मी थोडा भटकलो होतो, काही गैरसमज झाले होते, त्यातून आता माझी घरवापसी झाली. असही जाधव यावेळी म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!