Share

शेतकऱ्यांसाठी कर्ज काढून फेडण्याचीही सरकारची कुवत : हरिभाऊ बागडे

Published On: 

बीड: केंद्र व राज्य शासन सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांप्रती सरकारचे धोरण मदतीचे आहे. अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी वेळप्रसंगी सरकारने कर्ज काढले; परंतु शेतकऱ्यांची मदत केली. कर्ज फेडण्याचीही सरकारची कुवत असल्याचे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी शुक्रवारी येथे केले.

नगरपालिकेतर्फे शिवरत्न जिवाजी महाले व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुतळ्यांचे अनावरण आणि विविध कल्याणकारी योजनांच्या लाभार्थींना निधी वाटप कार्यक्रमात बागडे बोलत होते. रोहयो व फलोत्पादनमंत्री जयदत्त क्षीरसागर, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, मुख्याधिकारी मिलिंद सावंत, कुंडलिक खांडे, सचिन मुळूक, धुंडीराज पाटांगणकर उपस्थित होते.

बागडे म्हणाले, की सर्वसामान्यांसाठी अल्पदरात धान्य, किसान सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना वार्षिक 12 हजार रुपये दिले. निराधारांच्या मानधनात सरकारने वाढ केली. प्रथम प्रसूतीनंतर महिलेस पाच हजार रुपयांची मदत सरकार देत असून आयुष्मान भारत योजनेतून कुटुंबाला वार्षिक पाच लाख रुपयांपर्यंत आरोग्य सुरक्षा कवच देण्यात येते. यावेळी महात्मा फुले जीवनदायी योजना, अटल पेन्शन योजना, गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजनांचाही ऊहापोह झाला.

थोर पुरुषांचा लढा, संघर्ष स्मरणात राहील : क्षीरसागर

जिवाजी महाले, लोकमान्य टिळक यांच्यासारख्या थोर पुरुषांचा, क्रांतिकारकांचा संघर्ष, त्यांनी दिलेला लढा सदैव स्मरणात राहावा, त्यातून प्रेरणा मिळावी म्हणून स्मारके निर्माण करण्यात आल्याचे जयदत्त क्षीरसागर म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!