मुंबई : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) युवा खेळाडूंना परिपक्व बनवण्यासाठी ओळखला जातो. धोनी एखाद्या खेळाडूकडून त्याची सर्वोत्तम कामगिरी करवून घेतो. विराट कोहली आणि रोहित शर्मा ही अशाच खेळाडूंची उदाहरणे आहेत, ज्यांनी गेल्या दशकात भारतासाठी चमकदार कामगिरी केली. धोनीच्या नेतृत्वात हे खेळाडू तयार झाले.
हार्दिक पंड्याने धोनीच्या नेतृत्वाखाली २०१६ मध्ये पदार्पण केले होते. धोनीने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये आत्मविश्वास कसा निर्माण केला होता, हे हार्दिकने सांगितले. आयपीएल २०२२मध्ये गुजरात टायटन्सचे विजेतेपद आपल्या नेतृत्वाखाली जिंकणारा हार्दिक पंड्या भारतीय संघात परतला आहे. पंड्या पाठीच्या दुखापतीतून सावरला आणि आयपीएल २०२२ मध्ये फलंदाजी-गोलंदाजीत चमकदार कामगिरी केली. हार्दिक आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेत दिसणार आहे.
Indian captains to win an IPL title:
MS Dhoni ????????????????
Rohit Sharma ????????????????????
Gautam Gambhir ????????
Hardik Pandya ????
End of the list.#MSDhoni #RohitSharma #GautamGambhir #HardikPandya #IPL2022 #Cricket #CricTracker pic.twitter.com/EfIIXuSjuj— CricTracker (@Cricketracker) May 30, 2022
हार्दिक पंड्याने सांगितले, ”जेव्हा मी पहिल्यांदा भारतीय संघात आलो, तेव्हा अनेक प्रस्थापित स्टार्स संघाचा भाग होते. माझ्या पहिल्याच षटकात १९ धावा खर्ची पडल्या. धोनी दुसरे षटक देईल असे वाटले नव्हते, पण त्याने मला साथ दिली आणि मी तीन षटकांत ३७ धावा देत दोन बळी घेतले.”
हार्दिक म्हणाला, ”जेव्हा मी भारतीय संघात सामील झालो, तेव्हा मी ज्या खेळाडूंना पाहत मोठा झालो ते पाहिले – सुरेश रैना, हरभजन सिंग, युवराज सिंग, महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली, आशिष नेहरा. मग मी ज्या प्रकारचे पदार्पण केले – मला वाटले की मी पहिला क्रिकेटर आहे, ज्याने पहिल्या षटकात १९ धावा दिल्या. मला ठीक वाटले, कदाचित हे माझे शेवटचे षटक असेल. पण मी खूप भाग्यवान आहे की माही भाईच्या नेतृत्वाखाली खेळलो, ज्याने आमच्यावर खूप विश्वास ठेवला, ज्यामुळे आम्हाला वरच्या स्तरावर जाण्यास मदत झाली. माझ्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील तिसऱ्या सामन्यानंतर माही भाईने मला सांगितले की, तू विश्वचषक संघात असशील. त्या सामन्यात मी फलंदाजीही केली नाही, पण तू सिद्ध केले आहेस, अशी ग्वाही त्याने दिली. ते स्वप्न सत्यात उतरल्यासारखे होते.”
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

