मुंबई : दरवर्षी, मे महिन्याच्या दुसरा रविवार हा मातृदिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी मातृदिन 9 मे रोजी साजरा केला जात आहे. ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ हे आपण नेहमीच म्हणतो. खरं आहे, आई आजूबाजूला नसेल तर काहीच सुचत नाही. बाहेरून घरात आल्यानंतर सर्वात पहिली हाक मारली जाते ती आईला. सर्वात पहिले नजर शोधू लागते ती घरात आईला. बाकी कोणी घरात आहे की नाही हे सर्वात पहिले डोक्यात येतच नाही. तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी आईची जागा कधी कोणी घेऊ शकत नाही. अशाच आईसाठी मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
मातृदिनी अभिनेत्री करिना कपूरने एक सुदंर पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. करिनाने आपल्या छोट्या नवाबचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तैमूरसोबत हा फोटो शेअर केला असून चाहत्यांनी फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे.
https://www.instagram.com/p/COo_jvIp5ZF/?utm_source=ig_web_copy_link
करिना कपूरने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा फोटो शेअर करत लिहिले की, ‘आज आशेवर जग कायम आहे… आणि हे दोघे माझी आशा जागवतात… चांगल्या भविष्यासाठी… मातृदिनाच्या सर्व सुंदर आणि कणखर आयांना शुभेच्छा’, असे म्हणत करिनाने सर्व मातांना मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- उस्मानाबादेत कोरोनाने ११ जणांचा मृत्यू; ६२९ नव्या रुग्णांची वाढ
- वाहतूक तर बंद मग लसीकरणाला जायचे कसे? ग्रामीण भागातील तरुणांसमोर प्रश्न
- फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घ्यायचे आणि मागासवर्गीयांचा बळी द्यायचा, हा कसला सामाजिक न्याय ?
- ‘राज्य सरकारने स्वतःची पाठ थोपटत बसण्यापेक्षा आरोग्य यंत्रणेत सुधारणा करावी’
- जालन्यात कोरोनाचा कहर; ५८४ नवे रुग्ण तर ९ जणांचा मृत्यू


