Share

‘क्षितिज’ बाप-लेकीची हृदयस्पर्शी कथा

Published On: 

पाचव्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज मनोज कदम दिग्दर्शित क्षितिज हा चित्रपट पाहण्याचा योग आला. आधुनिकतेचा झगमगाट आणि अंगप्रदर्शनावर जास्त भर देऊन चित्रपट सृष्टीला व्यवसाय बनवू पाहणाऱ्यांच्या डोळ्यात चांगलंच अंजन घालणारा हा चित्रपट समंजस मनात ग्रामीण भागातील प्रश्नांचे काहूर उठवितो.

कृषीप्रधान संस्कृतीला फाटा देऊन औद्योगिकतकडे झपाट्याने वाटचाल करत असलेल्या भारतात दिग्दर्शकाने अतिशय प्रभावी पद्धतीने वंचितांचे प्रश्न या चित्रपटाच्या माध्यमातून समाजासमोर मांडले आहेत. कुटुंबाचा गड राखताना एका ग्रामीण बापाची होणारी असह्य धडपड, आणि मुलीची शिक्षणासाठीची केविलवाणी धडपड ही चित्रपटाची एका वाक्यातील कथा आहे. दिग्दर्शक आणि अभिनेत्यांनी जीव ओतून काम केल्यामुळे एक अप्रतिम कलाकृती निर्माण झाली आहे.

kshitij1

अभ्यासाची प्रचंड आवड असलेल्या ‘वच्ची’ (वासंती) ला इच्छा नसतानाही बापाच्या भीतीने शेतात काम करावे लागते. निसर्गाच्या अवकृपेमुळे परिस्थितीसमोर लाचार होत चाललेला वच्चीचा बाप श्रीपतराव (उपेंद्र लिमये) सावकाराच्या तावडीत अडकलेली जमीन सोडवण्यासाठी गाव सोडून दुसऱ्या जिल्ह्यात उसतोडीसाठी जातो. तर तिथे त्याला मुकदमाच्या जाचाला सामोरे जावे लागते. शिक्षणाचे महत्त्व कळत नसलेला श्रीपती त्याच्या मुलीवर आतोनात प्रेम करत असूनही तिची शाळा बंद करून तिला उसतोडीच्या कामाला जुंपतो. परंतु जिद्दी वच्ची तिचे अभ्यासाचे केविलवाणे प्रयत्न काही केल्या सोडत नाही.

बापाच्या नजरेत सलत असलेलं दप्तर वाचविण्यासाठी वच्ची ने साकारलेली धडपड खरंच हृदयस्पर्शी आहे. तिच्या प्रभावी प्रयत्नांमुळे तिच्या बापाचे होणारे मन:परीवर्तन शेवटी प्रेक्षकांचे डोळे पाणावण्यात चित्रपटाला यशस्वी करते. एकूणच समंजस मनांच्या पसंतीस उतरणारा हा चित्रपट दिग्दर्शकाची अप्रतिम कलाकृती आहे. सैराट च्या आर्चीला डोक्यावर घेणारे सुज्ञ मराठी प्रेक्षक या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असलेल्या वच्चीला नक्कीच मनात स्थान देतील.

– अमित मरकड, औरंगाबाद

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!