मुंबई – प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचाला १ लाख रुपयांच्या व्यक्तीगत जातमुचलक्यासह १४ अटींवर जामीन मंजूर करण्यात आलाय. मुंबई उच्च न्यायालयाने आज याबाबत सविस्तर निकालपत्र दिलं. गुरुवारी (२८ ऑक्टोबर) न्यायालयाने जामीन देण्याचा निर्णय दिला होता. त्यामुळे आता आज आर्यन खानसह तिघेही तुरूंगाच्या बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, या प्रकरणात राजकीय नेत्यांनी एन्ट्री घेतल्याने हे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक हे सातत्याने एनसीबीचे अधिकारी समीर वानखेंडेवर आरोप करत आहेत. यातच पंच प्रभाकर साईल यांनी गौप्यस्फोट केल्यानंतर वानखेडे यांच्या अडचणी वाढताना दिसत असतानाच आता वानखेडे यांच्यावर झालेल्या आरोपांनंतर एनसीबीच्या दक्षता पथकानं हैनिक बाफना यांना आज चौकशीसाठी बोलावलं आहे.
पंच प्रभाकर साईल यांनी गौप्यस्फोट करताना वादग्रस्त पंच किरण गोसावी यांचा निकटवर्तीय असलेल्या सॅम डिसुझा यांचं नाव घेतलं होतं. आणि त्यांनी शाहरुखच्या मॅनेजरकडे 25 कोटी रुपयांच्या डील संदर्भात बोलणी केल्याचा दावा केला होता. पण आपण सॅम डिसुझा नसून हैनिक बाफना असल्याचा दावा पालघरच्या या व्यक्तीनं केला आहे. आणि प्रभाकर साईल यांच्याविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल केलीय. या पार्श्वभूमीवर हैनिक बाफना यांना एनसीबीच्या पथकानं चौकशीला बोलावल्यामुळे त्यात काय माहिती पुढे येते हे महत्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- बीड जिल्ह्यात २४ तासांत २ शेतकऱ्यांची गळफास घेत आत्महत्या
- अजित पवारांचे मामेभाऊ जगदीश कदम यांच्या घरी ईडीची छापेमारी
- ’24 तास आर्यन खानच्या बातम्या देणारे मुख्यमंत्र्याला आणि परिवहन मंत्र्याला जाब विचारायला तयार नाहीत’
- इंडिज-बांगलादेश संघांत आज होणार लढत; आव्हान टिकविण्यासाठी विजय अनिवार्य
- ‘समीर वानखेडे मुंबई पोलिसांविषयी अविश्वास दाखवत आहे याचा अर्थ याने फर्जीवाडा केलाय’

