नागपूर : कुख्यात गुंड दाऊद इब्राहीम याचा फोन हॅक केल्याचा दावा करणाऱ्या हॅकरने आमदार कृष्णा खोपडे यांना पत्र पाठवून सावध केले आहे. हे पत्र त्याने टपालाने पाठवले आहे. तुमचे व तुमच्याशी संबंधित असलेल्यांच्या फोनचा सीडीआर, काढला जात आहे, संभाषण रेकॉर्डिंग केले जात आहे, असे या पत्रात नमुद असून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
खोपडे यांना शनिवारी हे पत्र त्यांच्या कार्यालयाच्या पत्त्यावर प्राप्त झाले आहे. खोपडे यांनी काल लकडगंज पोलिस ठाण्यात पत्र सादर करून तक्रार नोंदवली आहे. पत्र पाठवणायाने आपले नाव उघड करू नये, अशी विनंती केली असली तरी नावासह आपली स्वाक्षरीसुद्धा केली आहे. पत्र टाईप करण्यात आले आहे. स्वाक्षरी करणाऱ्याने मनीष भंगाळे असे नाव पत्राखाली लिहले असून आपली ओळख सायबर हॅकर, दाऊद इब्राहीम कासकर, रा. कराची, पाकिस्तान याचा सीडीआर काढणारा अशी दिली आहे.
सावधानतेचे निवेदन
पत्राच्या वर सावधानतेचे निवेदन असे शिर्षक देण्यात आले आहे. आपले, आपल्या कुटुंबीयाचे, मित्र मंडळी, आपले नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मोबाईल फोनचे विरोधक, शत्रु मार्फत सीडीआर काढले जात आहे. आपले मोबाईल ट्रॅकवर ठेवले असून त्यातील संभाषण रेकॉर्ड केले जात आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडील लँड लाईनचेही सीडीआर काढले जात आहे.
विरोधकांनी या कामी पोलिसांची मदत घेतली आहे. ज्यांच्याकडे हे काम सोपविले आहे, ते पोलिस पैसे मिळतात म्हणून हे घृणास्पद कार्य करीत असल्याचेही पत्रात म्हटले आहे. मुंबई, पुणे, ठाणे या भागातील काही पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावेसुद्धा त्याने नमूद केली आहेत. संभाषण रेकॉर्ड होत आहे, याची अधिक माहिती हवी असेल तर एक मोबाईल नंबरसुद्धा त्याने दिला आहे.मनीष भंगाळे ही व्यक्ती भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याला सिडीआर प्रकरणी अडचणीत आणणारी असल्याचेही कथित वृत्त आहे.
महत्वाच्या बातम्या-
“…अन्यथा आम्हाला झटका द्यावा लागेल”; राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारला पत्रातून दिला इशारा
अरे देवा…. नागपूरकरांवर लटकतेय ‘इतक्या’ दिवसांच्या लॉकडाऊनची टांगती तलवार ?
…तर शिवसेनेसोबत येण्यास भाजपा तयार: चंद्रकांत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

