Share

गुलाबराव पाटलांचा मतदारसंघ तहानलेला; धरणगाव ग्रामस्थांनी काढला नगरपालिकेवर हंडा मोर्चा

Published On: 

जळगाव:- गेल्या दोन वर्षांपासून जळगाव जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडत आहे. असे असताना देखील राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील प्रतिनिधित्व करत असलेल्या धरणगाव विधानसभा मतदारसंघात ठिकठिकाणी पाण्याची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाली आहे.

धरणगाव शहरात तर ऐन हिवाळ्यात आठ-आठ दिवस पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना वणवण फिरावे लागत आहे. यामुळे संतापलेल्या धरणगावकरांनी आज दुपारी नगरपालिकेवर धडक ‘जन आक्रोश हंडा मोर्चा’ काढत निष्क्रिय नगरपालिका प्रशासन तसेच मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्यपद्धतीचा निषेध नोंदवला आहे.

दरम्यान, सध्या धरणगाव नगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. राज्याचे सार्वजनिक पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे पदाधिकारी सत्ता सांभाळत आहेत. असे असताना शहरात ऐन हिवाळ्यात पाणीटंचाई भासत असल्याने मोर्चेकऱ्यांनी संताप व्यक्त केला. काही महिलांनी नगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पाण्याच्या मातीची भांडी फोडून निष्क्रिय प्रशासनाचा निषेध नोंदवला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!