Share

ग्रामपंचायती झाल्या, आता नगरपंचायतच्या निवडणुकींची तयारी सुरू

Published On: 

बीड : राज्यातल्या १३ नगर परिषदा आणि ८२ नगरपंचायतीच्या निवडणुका येत्या काही दिवसात होत असल्याने निवडणुकीच्या तयारीला बीडचे स्थानिक प्रशासन कामाला लागले आहे. मतदान याद्या तयार करणे, त्याबाबतचे आक्षेप नोंदवणे यासह इतर कामे स्थानिक प्रशासन करणार आहे.

१५ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रभागनिहाय मतदार याद्या या ५ नगरपंचायत अंतर्गत प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. कोरोनाच्या संसर्गामुळे स्थानिक पातळीवरच्या निवडणुका घेण्यात आल्या नाहीत त्यामुळे राज्यातल्या मुदत संपलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींवर प्रशासकाची नेमणुक आली आहे. येत्या काही दिवसांमध्ये राज्यातील १३ नगर परिषदा व ८२ नगरपंचायतींच्या निवडणुका घोषीत होणार असल्याने निवडणुकीची तयारी प्रत्येक नगरपंचायत प्रशासनाकडून केली जाऊ लागली.

मतदार याद्या बनवण्यात आल्या असून त्या प्रभागनिहाय १५ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या १-३-२०२१ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे तर मतदार केंद्र निहाय मतदार याद्या ८ मार्च २०२१ रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. बीड जिल्ह्यातील केज, वडवणी, शिरूर, आष्टी, पाटोदा या पाच नगरपंचायतींमध्ये निवडणुका होणार असल्याने येथील नगरपंचायत प्रशासनाने याद्या प्रसिद्ध करण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!