मुंबई : राज्यातील मुदत संपणार्या आणि लांबणीवर पडलेल्या 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून 15 जानेवारीला मतदान होत आहे. परंतु, आता सरपंचपदाचे आरक्षण मतदानानंतर काढण्याचा आदेश ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हाधिकार्यांना दिला आहे.
या ग्रामपंचाय निवडणुकीत शिवसेना पूर्ण ताकदीने उतरणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला पाहिजे, त्यासाठी संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरा, असे आदेश मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. सर्वाधिक ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्नशील आहेत. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांना त्यांनी पूर्ण ताकद लावण्यास सांगितले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी शिवसेना जिल्हाप्रमुखांची बैठक झाली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना मार्गगर्शन केले. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांसाठी जोमाने काम करा, लोकोपयोगी कामं करुन जनतेचा विश्वास संपादन करा, संपर्कमंत्री आणि पालकमंत्र्यांशी समन्वय राखा आणि एकजुटीने निवडणुकांना तोंड द्या, असं यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या
- ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्रात होणार देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ !
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएमकेअर फंडाबाबत व्यवस्थित खुलासा करावा; राष्ट्रवादीची मागणी
- विकासप्रकल्प पूर्ण करताना कालबद्ध मर्यादेत पूर्ण करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश
- दरेकरांनी निधीची चिंता करू नये त्यासाठी आमचे अजितदादा खंबीर आहेत – निलेश लंके
- आरक्षण सोडत/ सरपंच व उपसरपंच यांची निवड मतदानानंतर 30 दिवसाच्या आत होणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

