Share

आठवडा उलटून गेला तरी प्रस्तावाला राज्यपालांची मंजुरी नाही ; ठाकरे सरकार येऊ शकते धोक्यात

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नेमणूक करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने राज्यपालांकडे पाठवलेला प्रस्ताव अद्यापही मंजूर झालेला नाही त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह अजून हटलेल नाही.

राज्य मंत्रिमंडळाच्या ९ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव तयार करून त्याच दिवशी तो राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवण्यात आला होता. मात्र आठवडा उलटून गेला तरी राज्यपालांनी त्याला मंजुरी दिलेली नाही. या प्रस्तावाला राज्यपालांची मंजुरी मिळाली नाही तर उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपद आणि महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत येऊ शकते.

उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद आणि महाविकास आघाडी सरकारही अडचणीत येणार का? याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. कारण उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ही शपथ घेतली तेव्हा ते विधानसभा किंवा विधानपरिषद यापैकी कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते.

ते आमदार नव्हते. नियमानुसार मुख्यमंत्री अथवा मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या व्यक्तीला सहा महिन्यात विधानसभा किंवा विधानपरिषदेचं आमदार व्हावं लागतं. उद्धव ठाकरे यांना या नियमानुसार २८ मे पर्यंत आमदार व्हावं लागणार आहे. त्यामुळे राज्यपालांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!