नवी दिल्ली : काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भारत-चीन मुद्द्यावरून अनेक प्रश्न उठवलेले गेल्या काही दिवसांत दिसून आले आहे. चीनने गलवान खोऱ्यात केलेली घुसखोरी पंतप्रधान मोदी लपवत असून ते चीनला घाबरतात अशी टीका देखील त्यांनी ट्विटर द्वारे केली होती. तर, आज सकाळीच राहुल गांधींनी पुन्हा एक ट्विट करत मोदींवर निशाणा साधला आहे.
“पंतप्रधान मोदी वगळता, भारतीय सैन्याच्या क्षमतेवर आणि शौर्यावर सर्वांना विश्वास आहे. मोदींच्या या भ्याडपणामुळे चीनने आपल्या भूभागावर कब्जा केला आहे आणि आता त्यांच्या खोटेपणामुळे तो भाग चीनकडेच जाईल “, या आशयाचे ट्विट करत मोदींवर जहरी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
Everybody believes in the capability and valour of the Indian army.
Except the PM:
Whose cowardice allowed China to take our land.
Whose lies will ensure they keep it.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 16, 2020
दरम्यान, याआधी देखील चिनी घुसखोरीच्या कागदपत्रांवरून थेट मोदींच्या हिम्मतीलाच आव्हान दिले होते. राहुल गांधी यांनी, ‘ चीन का सामना करना तो दूर की बात, भारत के प्रधानमंत्री में उनका नाम तक लेने का साहस नहीं है. इस बात से इनकार करना कि चीन हमारी मातृभूमि पर है और वेबसाइट से दस्तावेज़ हटाने से तथ्य नहीं बदलेंगे’, असे ट्विट करत मोदींवर टीका केली होती.
तर, महत्वाची कागदपत्रे संरक्षण विभागाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आली होती. यामध्ये, लडाख भागात चीनने घुसखोरी केल्याचे मान्य करण्यात आले होते. मात्र, हि कागदपत्रे आता हटवण्यात आल्याचे आरोप राहुल गांधी यांनी लावले आहेत. दरम्यान, ‘मूड ऑफ दी नेशन’ या इंडिया टुडेच्या सर्वेक्षणामध्ये सर्वाधिक जनतेने देशाच्या सुरक्षेसंदर्भात राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर करत असलेल्या टीकेवरून नाराजी व्यक्त केली होती.


