Share

‘सरकारने पंधरा दिवसात नक्षलवाद्यांवर कारवाई करावी नाही तर’… बच्चू कडू यांचा सरकारला इशारा

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र दिनाला गालगोट लागले हेते. नक्षलवाद्यांनी सी- ६० कमांडो जवानांच्या ताफ्यावर आयईडी स्फोटकांद्वारे भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्यात १५ जवान शहीद झाले होते. त्यानंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे.

आमदार बच्चू कडू यांनी सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. ‘सरकारने पंधरा दिवसांत नक्षलवाद्यांना थांबवलं नाही, तर ज्या ठिकाणी नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात माझे जवान गेले तिथून मी आंदोलन सुरू करेल’ अशा शब्दात नक्षलवाद्यांवर कारवाई करण्याची मागणी सरकारला केली आहे. तसेच, देशात दहशतवादी हल्ला झाला तर संपूर्ण देश एकत्र येतो. मात्र नक्षलवाद्यांनी केलेला हल्ला केंद्र सरकार आणि राज्य सरकार अजूनही गांभिर्याने घेत नसल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या हल्ल्याची नैतिक जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!