🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : अदिती तटकरे यांनी राज्यातील प्रामुख्याने कोकणातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा विधानसभेत मांडल्या. तसेच कोकणात सातबारावर एकापेक्षा जास्त शेतकऱ्यांची नावं असतात. त्यामुळे शासनाने या बाबीचा विचार करुन मदत करावी, अशी विनंती त्यांनी केली.
त्याचबरोबर कोकणात मत्स्य व्यवसाय महत्त्वाचा आहे. मत्स्य व्यवसायात बोटी वापरताना मोठ्या प्रमाणात डिझेल लागतं. त्यासाठी शासनाने ५० कोटींची तरतूद केली असली तरी तो निधी कमी पडू शकतो. त्यामुळे कोकणातील आमदारांची बैठक बोलावून हा प्रश्न मार्गी लावावा, अशी सूचनाही तटकरे यांनी केली.
याशिवाय सरकारने अनुसूचित जमातीच्या महिला संस्थांसाठी वेगळ्या निधीची तरतूद करावी, पंचायत समिती, ग्राम पंचायत कार्यालय दुरूस्तीसाठी निधीची तरतूद करावी आणि अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळेच्या दुरुस्तीसाठी निधी द्यावा, अशी विनंती तटकरे यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1207986573960024068?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1207986797369708544?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

