लातूर: वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र संचारबंदी लावण्यात आली आहे. कोरोनाची दुसरी लाट सुरु झाल्यापासून रुग्ण संख्येत सुद्धा झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. वाढत्या रुग्णसंख्येला नियंत्रणात आणण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच सर्वत्र कडक निर्बंधांसह संचारबंदी लागू केली आहे. स्थानिक प्रशासन युद्धपातळीवर कोरोनाच्या या महामारीशी सामना करत आहे. मात्र काही नागरिक कोरोनाचे नियम पायदळी तुडवत आहेत त्यामुळे कोरोना आणखी पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शहरात शासकीय नियम पायदळी तुडवत एका व्यापाऱ्याने त्याचे कापडाचे दुकान सुरु केले. मात्र निर्बंध मोडत दुकान सुरु करणे दुकान चालकाला चांगलेच महागात पडले आहे. नियम तोडणाऱ्या कापड दुकानदाराकडून तब्बल १५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी करण्यात आली असून शहरातील लाहोटी कंपाऊंड येथील महालक्ष्मी टेक्स्टाईल या कापडाच्या दुकानात ही कारवाई करणायत आली आहे. या वेळी झोन डीचे प्रमुख बंडू किसवे तसेच गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हिबारे व इतर अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
लातूर शहरात दिवसेंदिवस वाढत असणारी रुग्णांची संख्या पाहता कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. अनेक व्यापाऱ्यांचे तसेच सामान्य माणसाचे आर्थिक नुकसान होत असले तरी कोरोनाच्या या महामारीतून वाचण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तसेच सरकार व स्थानिक प्रशासनाने लावलेल्या निर्बंधांचे तसेच नियमांचे पालन करावेच लागणार आहे. नागरिकांनी सर्व नियमांचे पालन करत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन येथील स्थानिक प्रशासन वेळो वेळी करत आहे.
महत्वाच्या बातम्या
- नाशिकच्या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केल्या संवेदना
- हव्यात १ लाख आल्यात फक्त १५ हजार, औरंगाबादेत लसींची प्रतिक्षा कायम!
- नाशिक ऑक्सिजन दुर्घटना : ‘आरोग्यमंत्री राजेश टोपे जाबाबदारी स्वीकारणार का ?’
- घटना दुर्देवी! यापुढे असे घडणार नाही याची काळजी घ्यावी-रामदास आठवले
- ‘नाशिकमधील रुग्णालयातील दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींना निश्चित शिक्षा केली जाईल’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

