Share

हव्यात १ लाख आल्यात फक्त १५ हजार, औरंगाबादेत लसींची प्रतिक्षा कायम!

Published On: 

औरंगाबाद : एक लाख लसींची मागणी असतांना शहराला केवळ १५ हजार लसींवर समाधान मानावे लागत आहे. महापालिका दररोज पाच ते सात हजार जणांचे लसीकरण करत आहे. त्यामुळे हा साठा दोन ते तीन दिवसात संपून जाईल. आणि औरंगाबादकरांच्या नशीबी पुन्हा वाट पाहणे येइल. औरंगाबाद महापालिकेने जम्बो लसीकरण मोहिम हाती घेतली असून, आत्तापर्यंत शहरातील १ लाख ७५ हजार ८९२ नागरिकांना लस देण्यात आली आहे.

वेळोवेळी निर्माण होणाऱ्या लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरणाच्या गतीवर परिणाम होत आहे. मंगळवारी दुपारनंतर शहरातील साठा संपला होता. मात्र रात्री उशिरा १२ ते १५ हजार लसींचा साठा शहरात दाखल झाल्याचे मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.

शहरात १६ जानेवारी पासून लसीकरणाला प्रारंभ झाला असून आजवर पहिल्या टप्यात आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी यांना लस देण्यात आली. दुसर्‍या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर आणि तिसर्‍या टप्यात ६० वर्षांवरील व ज्यांचे वय ४५ पेक्षा जास्त आहे, मात्र त्यांना गंभीर आजार आहेत अशा लाभार्थ्यांना लस देण्यास आली.

आता मनपा प्रशासनाने जम्बो लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. व्यापारी, कर्मचारी, कामगार वर्गाचेही लसीकरण सुरू झाले आहे. मात्र १ लाख लसींची मागणी केल्यानंतर केवळ १२ ते १५ हजार लसींचा साठा प्राप्त झाला आहे. आज सुरळीत लसीकरण होईल असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. मात्र पुढील साठा कधी प्राप्त होईल याबाबत माहित नसल्याचे मनपा अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी लसीकरण व मास्क वापरणे हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे पालिकेने सुरुवातीपासून लसीकरण मोहिम प्रभावीपणे सुरू केली आहे. लस घेतलेल्या नागरिकांना कोरोना सौम्य होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी दर आठवडयाला एक लाख लसींच्या साठयाची मागणी केली जात आहे. मात्र त्या प्रमाणात लसींचा साठा उपलब्ध होत नाही. सध्या शहरात १५ हजारांपर्यंत साठा असून पुढील साठा कधी मिळतो याची प्रतिक्षा कायम आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!