नवी दिल्ली : देश विरोधी मोहीम चालवणाऱ्या ४० वेबसाईट्सवर भारत सरकारने कारवाई केली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने ४० वेबसाईट्सना तत्काळ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रतिबंधित संघटना सिख्स फॉर जस्टिस (SFJ) निगडित संशयित कारवाई थांबविण्यासाठी हि कारवाई केली गेली असल्याचे गृह मंत्रालयाने रविवारी स्पष्ट केले.
संतापजनक : आमदाराच्या वडिलांच्या अंत्यविधीला तब्बल १० हजार लोकांची झुंबड
अमेरिका स्थित सिख्स फॉर जस्टिस (SFJ) एक खालिस्तान समर्थक समूह आहे. गृह मंत्रालयाचे एक प्रवक्ता ने सांगितले, ‘बेकायदेशीर वर्तणुक (निरोधक) अधिनियम (यूएपीए), 1967 च्या अंतर्गत सिख्स फॉर जस्टिस (एसएफजे) हि एक बेकायदेशीर संघटना आहे. गृह मंत्रालयाच्या शिफारशी नंतर दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान (MEITY) मंत्रालयाने प्रऔद्योगिक कायदा, २००० च्या ६९ अ च्या अंतर्गत एसएफजेच्या ४० वेबसाईट्सवर बंदी घालण्याचे आदेश दिले.
पारनेरमध्ये राजकारण तापलं : काहीही झालं तरी 17 झिरो करणारच, निलेश लंकेंची डरकाळी
दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भारतामध्ये सायबर स्पेस मध्ये निरीक्षण करणारी नोडल एजन्सी आहे. मागील वर्षी एसएफजीच्या राष्ट्राविरोधी कारवायांमुळे प्रतिबंधित केले गेले होते.एसएफजे ने फुटीरवादी अजेंड्याखाली सीख जनमत संग्रहावर जोर दिला होता. अन्य एका अधिरकाऱ्याने सांगितले कि, ही संघटना खलिस्तानवादाचा खुल्याने समर्थन करते ज्याने भारताच्या सार्वभौमत्वावर व प्रादेशिक अखंडतावर आव्हान देते.


