Share

‘मराठा आरक्षणाचा सरकारने लवकरात लवकर विचार करावा, अन्यथा…’; खासदार संभाजी राजेंचा इशारा

Published On: 

पुणे: राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न मार्गी लागला नाही. त्यामुळे अनेकवेळा यावर भाष्य केले जाते. त्याच सोबत सरकारवर टीका देखील केली जाते. मात्र अद्याप यावर ठोस तोडगा निघाला नाही. यावर आता खासदार संभाजी राजे भोसले (Sambhaji Raje Bhosale) यांनी वक्तव्यं केले आहे. सरकारच्या समोर जे प्रस्ताव मांडले आहेत यावर अजूनही सरकारने कुठला निर्णय घेतला नाही, अशी खंत संभाजी राजेंनी बोलून दाखवली.

पुढे बोलताना भोसले म्हणाले, ज्याप्रमाणे ओबीसी समाजाला शिक्षणात सवलत देण्यात आली त्याच प्रमाणे गरीब मराठा समाजाला देखील शिक्षणात सवलत देण्यात यावी अशी मागणी भोसले यांनी केली आहे. मराठा आरक्षणावर बोलण्याचा अधिकार मराठा समाजातील सर्व संघटनांना आहे. मी सुद्धा अनेकदा सरकारला याबाबत सांगितले आहे. आरक्षण हा एक वेगळा टप्पा असून ते लगेच मिळत नाही, असंही यावेळी सांभाजी राजे भोसले म्हणाले.

मराठा अरक्षणावर लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा अशी मागणी करताना संभाजी भोसले म्हणाले, मी शांत बसलोय, लोकसुद्धा विचार करत असतील की राजे शांत का बसले परंतु वेळ प्रसंगी मी बोलेल. बरोबर नसणाऱ्या अनेक गोष्टी सध्या घडत आहे. तसेच सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा मराठा समाज काही गप्प बसणार नाही, असा इशारा देखील यावेळी संभाजी राजे भोसले यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!