🕒 1 min read
मुंबई: १९ ऑगस्टरोजी मोहर्रम उत्सवानिमित्त राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. वाझ मजलीस तसंच मातम मिरवणुका काढू नयेत असे आवाहन सरकारने केले आहे. घरीच राहून सध्या पद्धतीने मोहरम पाळण्यात यावा असे आव्हान शासनाने केले आहे.
केंद्र व राज्य शासनाकडून सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांना बंदी असल्यामुळे सार्वजनिक मातम मिरवणूकीला परवानगी देता येणार नाही. खाजगी मातम देखील शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करुन घरीच करावेत. यावेळी नागरिकांनी एकत्र येण्याचे टाळावे असे आव्हान शासनाने केले आहे.
वाझ मजलीस हे कार्यक्रम शासनाच्या नियमांचे पालन करुन ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात यावेत. ताजिया ,आलम ताजिया किवा आलम काढू नयेत.असे या नियमावलीत म्हटले गेले आहे. राज्यात अजूनही कोरोना संक्रमित होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे ही सर्व खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे सरकारने सर्वाना घरीच सण- उत्सव साजरे करण्याचे आव्हान नागरिकांना केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘गायीच्या दुधाला 35 रुपये तर म्हशीच्या दुधाला 60 रुपये प्रति लिटर खरेदी दर द्या’
- रेल्वे प्रवासासाठी लसीचे दोन डोस घेतलेल्यांना परवानगी; मनसेच्या ‘या’ प्रश्नांची उत्तरं सरकार देणार काय ?
- सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी महाराष्ट्राला बदनाम करण्याचेच कटकारस्थान होते ?
- मराठा आरक्षण : पुण्यात आज राज्यस्तरीय बैठक; संभाजीराजेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
- ‘मोदी सणासुदीला गर्दी होणार असल्याने चिंतेत,तर राज्यातील भाजपनेते मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन करत आहेत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
