Share

गोपाळ शेट्टी यांचा मोठा निर्णय; रेल्वे, संसदीय कार्यसह सर्व समित्यांचे दिले राजीनामे

Published On: 

मुंबई : भाजपचे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी मोठा निर्णय घेतला असून त्याची माहिती त्यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे दिली आहे. शेट्टी यांनी संसदीय कार्य, रेल्वे आणि हाऊस समितीसह सर्व संसदीय समित्यांचे राजीनामे दिले आहेत. तसेच केंद्रीय संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांना राजीनामे पाठविल्याचेही शेट्टींनी सांगितले.

यावेळी बोलतांना शेट्टी म्हणाले की,’डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी काश्मीरसाठी प्राण दिले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीर प्रश्न मार्गी लावला. सर्वांना पक्के घर मिळावं हे मोदींचे स्वप्न आहे. त्यासाठीच मी संघर्ष करत आहे. त्यामुळेच मी माझ्या पदाचा राजीनामा प्रल्हाद जोशींकडे पाठवला आहे. समित्यांचा मी दिलेला राजीनामा ते स्वीकारतील अशी आशा व्यक्त करतो’ असे ते म्हणाले.

दरम्यान, अनेक वर्षांपासूनशेट्टी हे झोपडपट्टी पुनर्वसन आणि त्या ठिकाणी गोरगरिबांना पक्के घर लवकरात लवकर मिळावे यासाठी कार्य करीत आहेत. २०१७ मध्ये त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झोपडपट्टी पुनर्वसनासाठी नवीन संशोधित कायदा केला. परंतु आजपर्यंत या झोपडपट्टीवासियांचं पुनर्वसन झालं नाही. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तसेच डॉ. योगेश दुबेंमार्फत मानव अधिकार आयोगापर्यंत शेट्टी यांनी पाठपुरावा केला. मात्र, अजूनपर्यंत २०१७ च्या कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने अनेक प्रकल्प रेंगाळलेले आहेत. त्यामुळेच या कामाला वेळ देण्यासाठी सर्व समित्यांचे राजीनामे शेट्टी यांनी दिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!