Share

आनंदाची बातमी: ‘ही’ टेलिकॉम कंपनी करणार डिजिटल ट्रान्झॅक्शनमध्ये पदार्पण !

Published On: 

🕒 1 min read

मुंबईः आजच्या डिजिटल युगामध्ये बँकिंग व्यवहार तासेच सर्वसामान्य आर्थिक व्यवहार देखील डिजिटल माध्यमातून केले जातात. त्यामुळे ग्राहकांच्या आर्थिक व्यवहार गोष्टी सुलभ होण्यास मदत होते. त्यामुळे अनेक खाजगी डिजिटल पेमेंट प्लाटफॉर्म कडून ग्राहकांना या सेवा दिल्या जातात. तर आता आणखी एक टेलिकॉम कंपनी देखील आपल्या ग्राहकांसाठी डिजिटल ट्रान्झॅक्शन सेवा सुरु करणार आहे.

एअरटेल ही टेलिकॉम कंपनी भारतात डिजिटल पेमेंट, डिजिटल ट्रान्झॅक्शनसाठी सेवा सुरू केली आहे. ‘एअरटेल सेफ पे’ असे या सेवेचे नाव आहे. ही सेवा एअरटेलच्या ऑनलाइन बँकिंग सिस्टम एअरटेल पेमेंट बँकच्या अंतर्गत सुरू करण्यात आली आहे. तसेच एअरटेलने दावा केला आहे की, यावरून युजर नेट बँकिंग आणि Unified Payments Interface (UPI) ट्रान्झॅक्शन विना कोणतेही फ्रॉड किंवा चोरीपासून सुरक्षित असल्याच कंपनीने सांगितलं आहे.

इंडिया-फर्स्ट इनोव्हेशन, ‘एअरटेल सेफ पे’ हे एअरटेलच्या ‘टेलको एक्स्क्लुझिव्ह’ नेटवर्क बुद्धिमत्तेचे लाभ देते. हे फिशिंग, चोरीची क्रेडेन्शियल्स किंवा संकेतशब्द आणि अगदी नकळत ग्राहकांना पकडणारे फोन क्लोनिंग यासारख्या संभाव्य फसवणूकीपासून उच्च पातळीचे संरक्षण प्रदान करते. एअरटेल सेफ पे’ वापरुन एअरटेल पेमेंट्स बँक ग्राहक सुरक्षित डिजिटल पेमेंट करू शकतात आणि लाखो व्यापारी, ऑनलाइन किरकोळ विक्रेते आणि सुविधांना पैसे पाठवू शकतात. ग्राहक एअरटेल पेमेंट्स बँकेत एअरटेल थँक्स अॅपच्या माध्यमातून अवघ्या काही मिनिटांत खाते उघडू शकतात. त्यानंतर ते पूर्णपणे सुरक्षित डिजिटल पेमेंटच्या फायद्यांचा आनंद घेऊ शकतात.

या सेवेचा वापर करण्यासाठी एअरटेल पेमेंट बँक मध्ये जाऊन ‘एअरटेल सेफ पे’ सुरू करावे लागाणार आहे. आपल्या मोबाइलवर एअरटेल थँक्स अॅप उघडा. यानंतर स्क्रीवर खाली दिसत असलेल्या पेमेंट बँक ऑप्शन दिसेल. यावर क्लिक करा. यानंतर अॅड करण्यात आलेल्या अकाउंटच्या सेफ पे स्टेट डिअॅक्टिवेटेड दिसेल. अकाउंटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इनएबल सेफ पे चे ऑप्शन दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही नेट बँकिंग आणि यूपीआय पेमेंट्स सोपी होऊ शकते. ज्यावेळी तुम्ही ट्रान्झॅक्शन कराल त्यावेळी तुम्हाला अलर्ट मेसेज येईल. तुमच्या परवानगीशिवाय ऑनलाइन पैशांची देवाण-घेवाण होऊ शकणार नाही. ही सेवा एअरटेल युजर्संसाठी खूपच फायदेशीर ठरू शकते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!