मुंबई : राज्यातील कोरोना बाधित रुग्नांची आकडेवारी जरी वाढत असली तरी दुसरीकडे ही आकडेवारी असली तरी कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्याचे प्रमाणही वाढत आहे. रुग्णांचा योग्य प्रतिसाद, आरोग्य यंत्रणेचे परिश्रम यामुळे आतापर्यंत बाधित रुग्णांपैकी सुमारे २९५ रुग्ण बरे झाले आहेत.
तसेच ९ मार्चला राज्यात पहिले दोन रुग्ण आढळले. पुण्यातील हे दाम्पत्य यशस्वी उपचारानंतर २३ मार्चला घरी गेले. राज्यातील हे पहिले कोरोनामुक्त रुग्ण होते. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही रुग्ण् बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे सांगितले होते.
याचप्रमाणे ५२ हजार जणांच्या नमुन्यांपैकी आतापर्यंत ४८,१९८ निगेटिव्ह तर २९१६ पॉझिटिव्ह आढळले. त्यापैकी सुमारे ६० ते ७० टक्के जणांमध्ये लक्षणे दिसली नाहीत. २५ टक्के जणांमध्ये सौम्य स्वरूपाची लक्षणे दिसली. तर पाच टक्के पेक्षाही कमी रुग्णांची स्थिती गंभीर असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
