Share

आनंदाची बातमी : आजपासून मिळणार रेल्वेची तत्काळ तिकीट बुकिंग सेवा

Published On: 

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २२ मार्चपासून रेल्वेची प्रवासी वाहतूक बंद आहे. पण सध्या निवडक १५ मार्गांवर राजधानी विशेष ट्रेन तर आणि १ जूनपासून २०० स्पेशल ट्रेन चालविण्यात येत आहेत. भारतीय रेल्वेने कोरोना संकटात रेल्वे प्रवाशांसाठी तात्काळ तिकीट बुकिंग सेवा सुरू केली आहे. रेल्वेने चालविलेल्या विशेष प्रवासी गाड्यांमध्ये आणि एसी स्पेशल ट्रेन्समध्ये तत्काळ तिकिट बुकिंगची सेवा आजपासून सुरू झाली आहे.

मध्य रेल्वेच्या पीआरओ शिवाजी सुतार यांच्या माहितीनुसार ही सुविधा 30 जून आणि त्या नंतरच्या तारखेला धावणा-या गाड्यांसाठी सुरू होईल. रेल्वे प्रवासी 30 जूनपासून प्रवासासाठी तत्काळ तिकिट सुविधेचा लाभ घेऊ शकतील. तत्काळ तिकिटे एसी क्लाससाठी सकाळी 10 पासून आणि सकाळी 11 पासून स्लीपर क्लाससाठी बुक केली जातील.

द्वितीय श्रेणी किंवा स्लीपरसाठी तत्काळ तिकिटे बुक करायची असतील तर याची वेळ सकाळी 11 वाजता आहे. एसी तिकिटांसाठी बुकिंगची वेळ सकाळी 10 वाजता आहे. तत्काळ तिकिटांच्या बुकिंगवर तुम्हाला प्रवासादरम्यान आयडी असणे आवश्यक आहे. बरेच प्रवासी एकत्र असल्यास त्यातील एकाचा आयडी पुरेसा असेल, पासपोर्ट, आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र, केंद्र किंवा राज्य शासकीय कर्मचारी म्हणून ओळखपत्र, रेल्वे प्रवासादरम्यान बँक पासबुक, शाळा किंवा महाविद्यालय आयडी वैध असेल. तत्काळ तिकीट रद्द केल्यास परतावा मिळणार नाही. संपूर्ण रक्कम रेल्वेमधून वजा केली जाते. ट्रेन रद्द झाल्यास तुम्हाला संपूर्ण पैसे परत मिळतील.

12 ऑगस्टपर्यंत सर्वसामान्य रेल्वेसेवा बंद करण्यात आल्या आहेत. याबाबत गुरुवारी भारतीय रेल्वेने आदेश दिला आहे. मेल आणि एक्सप्रेस गाड्यांसह सर्व सामान्य प्रवासी सेवा गाड्या 12 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत, असे या आदेशात म्हटले आहे. नवीन ऑर्डरवरून हे स्पष्ट झाले आहे की ,12 ऑगस्टपर्यंत आता फक्त विशेष गाड्या चालवता येतील.

पुण्याचा लॉकडाऊन शिथिल कऱणे धोकादायक : महापौर मोहोळ

तर अशा शिव्या देऊ की… रात्रभर झोप येयची नाही, मुश्रीफांचा पडळकरांना दम

….आणि पार्थ पवार म्हणाले लंके साहेब पुढच्या महिन्यात परत येतो !

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!