Share

आयपीएलच्या 200 सामन्यांच्या प्रवासाला धोनीने दिली म्हातारपणाची उपमा

Published On: 

मुंबई : आयपीएलमध्ये शुक्रवारी झालेल्या झालेल्या सामन्यात महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने पंजाब किंग्सचा ६ गडी राखुन पराभव केला. या विजयासह चेन्नईने आयपीएलमध्ये गुणतालीकेत खाते उघडले आहे. यंदाच्या सत्रातील चेन्नईचा हा पहिला विजय आहे.

शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) साठी महेंद्रसिंग धोनीने आपला 200 वा सामना खेळला. धोनीच्या टीमने सहा गडी राखून विजय मिळवून दिला आणि हा सामना संस्मरणीय बनवला. निर्धारित 20 षटकांत पंजाबने आठ गडी गमावून 106 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल चेन्नईने 15.4 षटकांत 107/4 धावा करून सामना जिंकला. चेन्नईच्या विजयात वेगवान गोलंदाज दीपक चहरने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. दीपकने 13 धावा देऊन चार खेळाडूंना पॅव्हेलियनवर पाठवले.

सीएसकेकडून आतापर्यंत एमएस धोनी आयपीएलमध्ये 176 सामने खेळला आहे. त्याने चॅम्पियन्स लीग टी -20 मध्ये सीएसकेकडून 24 सामने खेळले. धोनीने सीएसकेसाठी 199 सामन्यांचे नेतृत्व केले आहे. २०१२ च्या चॅम्पियन्स लीग सामन्यात धोनी प्लेइंग इलेव्हनचा एक भाग होता, परंतु त्या सामन्यात सुरेश रैना कर्णधारपदाच्या ताब्यात होता. एकूणच आयपीएलमध्ये धोनीने आतापर्यंत एकूण 206 सामने खेळले आहेत. धोनी हा संघासाठी 200 टी -20 सामने खेळणारा दुसरा खेळाडू आहे.

मॅचनंतर धोनीला चेन्नईच्या परफॉर्मन्स बद्दल तसंच त्याच्या वैयक्तिक प्रवासाविषयी अँकरने प्रश्न विचारला. त्यावर धोनीने, ‘असा प्रश्न विचारल्यावर मला वय वाढल्याची आठवण होते तसंच म्हातारपणाची जाणीव होते, असं तो म्हणाला. हा खरोखरच मोठा प्रवास होता जो 2008 पासून सुरु झाला होता. हा प्रवास अनेक खाच खळग्यांनी तसंच सुंदर क्षणांनी व्यापलेला आहे. भारताशिवाय मी दुबई, साऊथ आफ्रिलेला खेळलो प्रत्येक ठिकाणी खेळण्याची मजा वेगळी होकी. आतापर्यंतचा प्रवास तरी खूप मजेदार राहिलेला आहे.’

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!