Share

तहसील कार्यालयाच्या चुकीचा फटका निराधारांना; खाते क्रमांक चुकवल्याने पगार मिळेना!

Published On: 

उस्मानाबाद: उस्मानाबाद येथील तहसील कार्यालयाचे ढिसाळ कामकाज पुन्हा चव्हाट्यावर आले आहे. तहसील कार्यालयाकडून निराधारांचे खातेनंबर बँकेत चुकीचे गेल्याने त्यांना मिळणाऱ्या मदतीवर पाणी फेरले आहे. तहसील कार्यालय हे खातेनंबर कधी दुरुस्ती करुन बँकेला देणार ? असा सवाल निराधारांमधून केला जात आहे. संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन या विविध योजनेच्या माध्यमातून वृध्द, दिव्यांग, विधवांना प्रतीमहा १ हजार रुपये शासनाची मदत मिळते.

याबरोबरच कोरोना संसर्ग वेगाने वाढत असल्याने १५ दिवसाचा लॉकडाऊन राज्यात जाहीर झाला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या मदतीत कळंब तालुक्यातील १७ हजार निराधार लाभार्थ्यांना प्रत्येकी १ हजार रुपये आगाऊ मदत मिळणार आहे. संजय गांधी योजना कार्यालयाकडून बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कळंबसाठी गत महिन्यात एक महिन्याची पेन्शन व गेल्या दोन दिवसापूर्वी फेब्रुवारी, मार्च महिन्याचे प्रत्येक महिना एक हजार प्रमाणे निराधाराचे धनादेश पाठविले आहेत. या धनादेशासोबत लाभार्थी खातेधारकाची जी यादी पाठविली आहे.

यातील २५ च्या वर खाते धारकांचे खाते क्रमांक अकरा ऐवजी बारा अंकी असून यामुळे सबंधित बँक खाते क्रमांक चुकीचे असल्याने लाभार्थ्यांच्या खात्यावर बँक पैसे जमा करत नाही. गेल्या महिन्यात हेलपाटे मारून हे लाभार्थी परेशान असून आता सरकारची मदत व दोन महिन्याच्या पेन्शनसाठी या वृध्दांना बँकेकडे हेलपाटे मारण्याची वेळ येऊ नये अशी मागणी हे वृध्द पेन्शनधारक करीत आहेत.बँकेकडून ही निश्चित दुरुस्ती कधी होणार हे सांगितले जात नाही.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!