Share

शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन! मोदी सरकारकडून खरीप पिकांच्या एमएसपीत वाढ करण्याचा निर्णय

Published On: 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांना दिलासा देत खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय आज बुधवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला. कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी यासंदर्भात माहिती दिली.

कृषिमंत्री म्हणाले, गेल्या ७ वर्षात केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकेल. एमएसपी २०१८ पासून किंमतीवर ५० टक्के परतावा जोडून घोषित केले जाते. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर तांदूळ पिकावरील एमएसपीमध्ये ७२ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

यानंतर आता तांदळाची किंमत १८६८ रुपये प्रति क्विंटलवरून १९४० रुपये प्रति क्विंटलवर पोहोचली आहे. याच बरोबर, बाजरीवरील एमएसपीदेखील २१५० रुपये प्रतिक्विंटलवरून २२५० रुपये प्रतिक्विंटल करण्यात आली आहे.

चालू खरीप हंगामासाठी (केएमएस) २०२०-२१ (६ जून २०२१ पर्यंत) गेल्या वर्षीच्या ७३६.३६ एलएमटीच्या तुलनेत एमएसपीवर ८१३.११ एलएमटीपेक्षा जास्त धान्य येथे खरेदी केले गेले. त्यामुळे १२० लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांना फायदा झाल्याचे तोमर म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!