Share

मी बाळासाहेबांचा शिवसैनिक मान खाली घालून जगू शकत नाही; सोने व्यापाऱ्याची आत्महत्या

Published On: 

🕒 1 min read

नोटबंदी आणि जीएसटीमुळे व्यापार अडचणीत आला, आजवर अनेक लोकांना मदत केली मात्र सर्वानीच माझा विश्वासघात केला. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक असून ताठ मानेन जगलो. मात्र, आता मान खाली घालून जगू शकत नसल्याची फेसबुक पोस्ट लिहित कराड येथील सोने व्यावसायिक राहुल फाळके यांनी आत्महत्या केल्याच समोर येत आहे. कराडमधील वनवास माची येथे राहणारे राहुल फाळके यांचे कराड येथे मंगलमुर्ती ज्वलर्स नावाचे दुकान आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदी लागू केली तेव्हापासून सोने व्यापाराला उतरती कळा लागली, त्यातच जीएसटी लागू केल्याने संपूर्ण व्यापाराच अडचणीत आला असल्याचं राहुल यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहील आहे. आज सकाळी राहुल फाळके हे आपल्या मुलाला दररोजप्रमाणे शाळेत सोडून आले. त्यांनी आपले सोन्याचे दुकानही उघडले. मात्र काही वेळातच ते बाहेर गेले. पुढे दुपारी दोनच्या सुमारास कोपर्डी हवेली गावाजवळील रेल्वे रुळावर त्यांचा मृतदेह आढळून आला.
राहुल फाळके यांची अखेरची फेसबुक पोस्ट
सर्वाना माझा शेवटचा नमस्कार 

जेव्हापासून मोदींनी नोट बंदी केली …. तेव्हा पासून सोने चांदी व्ययवसायाला उतरती कळा लागली आणि हे कमी कि काय म्हणून GST लागू केला.
त्यामुळे संपूर्ण व्यवसाय अडचणीत आला.आधीच आमचा व्यावसाय उधारी शिवाय चालत नाही. त्यामुळे उधारीत पैसे अडकले
खूप लोकांवर विश्वास ठेवून त्यांना मदत केली
खूप जणांना अडचणीतून बाहेर आणले
पण आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने माझा फक्त विश्वासघात केला
बाळासाहेब ठाकरेंच्या विचारानुसार 1 शिवसैनिक म्हणून समाजामध्ये राहताना नेहमी ताठ मानेने जगलो पण आज काही चूक नसताना मन खाली घालुन मी जगू शकत नाही

मला कोणाला हि फसवायच नव्हतं
माझा तसा स्वभाव हि नाही
पण प्रत्येकाने मला फसवले आणि त्यामुळे मला सर्वाना फसवून जायला लागत आहे.

आणि माझ्या मृत्यूस कोणालाही जबादार धरू नये
आणि कोणावर हि कोणतीही कारवाई करू नये

माझ जीवन उध्वस्त झालंय
मला कोणाचं आयुष्य उध्वस्त नाही करायचं

Alwaida ……

घरातील सर्वांसह …. माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येकाला खूप miss करेन

तुमचा
राहुल

आणि सर्वात महत्वाचं …… यापुढे कृपा करून शिवसेनेला निवडून द्या
कारण फक्त थापा मारणारे आणि भाषणबाजी करणारे खूप नेते आहेत पण
श्री उद्धव ठाकरे यांना मन आहे

ते उत्कृष्ट वक्ता नसतील पण जनतेच्या वेदना त्यांना नक्की समजतात आणि जेव्हा महाराषष्ट्रावर भगवा फडकेल तीच मला खरी श्रद्धांजली असेल

आणि माझी फक्त 1 च विनंती आहे माझ्या कुटुंबाची जबाबदारी शिवसेना आणि शिवसैनिकांनी घ्यावी

हि तुमच्या एका शिवसैनिकांची कळकळीची आणि शेवटची विनंती

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!