नवी दिल्ली: कोरोनामुळे अनेक देशांतील वैद्यकीय पायाभूत सुविधा कोलमडल्या. ही स्थिती संपूर्ण जगावर ओढवली होती. आता कुठे हळू हळू जग पुन्हा रुळावर येत आहे. मात्र अशातच एक मोठी बातमी समोर येत आहे. यूएस संसर्गजन्य रोग तज्ञ अँथनी फौसी यांनी म्हटले आहे की, कोरोना व्हायरस महामारी अद्याप संपलेली नाही आणि एक नवीन प्रकार लवकरच कहर करू शकतो.
फौसी यांनी सांगितले की, यूएसमध्ये संसर्गाची सुमारे २५ किंवा ३० टक्के नवीन प्रकरणे BA.2 सबवेरियंटमधून येत आहेत आणि लवकरच ते संक्रमणाचे एक महत्त्वाचे कारण बनू शकतात. त्यांनी या प्रकरणांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. ओमिक्रॉनपेक्षा ba.2 सबवेरियंट सुमारे ५० ते ६० टक्के जास्त संसर्गजन्य आहे, परंतु ते अधिक गंभीर असल्याचे दिसत नाही. असे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयातील व्हाईट हाऊसचे मुख्य वैद्यकीय सल्लागार फौसी यांनी म्हटले आहे.
दरम्यान या नवीन प्रकाराने चीन आणि यूकेसह युरोपच्या अनेक भागांमध्ये प्रवेश केला आहे. आरोग्य अधिकारी कोरोना व्हायरसची लस आणि बूस्टर डोस यावर अधिक भर देताना दिसून येत आहेत. आता यासंदर्भात भारतातही काही तातडीने पावले उचलली जाण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय आरोग्य विभागाने राज्यांना पत्र लिहित खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- मविआ सरकारने छत्रपतींचीही फसवणूक केली- चंद्रकांत पाटील
- IPL 2022 : ‘किंग कोहली’ स्पर्धेआधी आरसीबीच्या संघात सामील; चाहते सुखावले!
- काश्मीरमधील आशियातले सर्वांत मोठे ‘ट्युलिप गार्डन’ लवकरच होणार खुले
- “… तर वहिनीसाहेबांचा हा आग्रह आम्ही पाळू”, अमृता फडणवीसांच्या ‘त्या’ सल्ल्यावर राऊतांचे प्रत्युत्तर
- IPL 2022 : ‘त्याने मला फिनिशर कसे बनायचे सांगितले’; दिल्लीच्या स्टॉइनिसला चेन्नईच्या ‘थाला’ने दिले मास्टरक्लास
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

