मुंबई: गोवा विधानसभा निवडणुकीवरुन (Goa Assembly Election) राज्यातील राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar) यांचा मुलगा उत्पल पर्रिकर यांच्या उमेदवारीवरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्याला आता भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले होते, गोव्यात खुनी, बलात्कारींना तिकीट मिळतं. मला का मिळत नाही? असा सवाल उत्पल पर्रिकर यांनी केला होता. याकडे संजय राऊत यांचं लक्ष वेधलं असता राऊत यांनी फडणवीसांवर खोचक टीका केली. उत्पल पर्रिकर यांच्या मताशी मी सहमत आहे. भाजपच्या गोव्यातील नेत्यांवर गंभीर आरोप आहेत. ते लँड माफिया आहेत. काहींवर अफू चरस, गांज्याचे आरोप आहेत. त्यांना पक्षात घेतलं आहे. त्यामुळे उत्पल पर्रिकरांचं योगदान काय? या पेक्षा राजकारणातील ग्रेट गॅम्बलर्स आणि ठकस् ऑफ गोवा घेऊन तुम्ही निवडणुका लढू इच्छिता का, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला होता.
संजय राऊत यांनी केलेल्या या टिकेनंतर भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रत्युत्तर देत थेट आवाहनच केले आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, संजय राऊत यांचं फारच चाललं आहे. सगळ्या जगातले विद्वान ते आहेत. कशाला त्यांनी पर्रिकरांच्या मुलाला द्या, अपक्ष लढू दे, तुमचं कोण ऐकायला बसलं आहे तिथे. हिम्मत असेल तर गोव्यातला एखादा मतदारसंघ लढवा तुम्ही. मोदीची गुजरातमधून उठतात आणि उत्तर प्रदेशात जाऊन लढतात, तुम्ही लढा. नुसती आपली भाषणं करता, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना फटकारलं आणि थेट आव्हानही दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
शहराचा विकास रोखण्याचा विरोधकांचा प्रयत्न अयशस्वी; आमदार बंब यांचे प्रतिपादन!
‘यास भीती म्हणावी की संकुचित मनोवृत्ती?’; रोहित पवारांची चंद्रकांत पाटलांवर टीका
मी निष्ठा आणि प्रामाणिकपणा सोडला नाही; त्याचेच आज फळ मिळाले-खा. भागवत कराड
औरंगाबादेतील पहिल्या ओमायक्रोनबाधित रुग्णाने मानले मनपाचे आभार; म्हणाला….
‘महाराष्ट्राचा बुलंद आवाज हरपला’; मुख्यमंत्र्यांकडून एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

