उस्मानाबाद: जिल्ह्यातील वडगाव येथे एमआयडीसीसाठी जमिनी संपादित केल्या आहेत, मात्र त्या जमिनीचा मावेजा न मिळाल्यास सॅनिटायझर पिऊन सामुहिक आत्महत्या करण्याची धमकी येथील शेतकऱ्यांनी दिली आहे. आद्योगिक विकास महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात शेतकऱ्यांनी धमकीवजा इशारा दिला आहे.
वडगाव येथे एमआयडीसीने ३६० एकर जमीन संपादित केली आहे. त्यासाठी एकूण ५८ कोटी ९८ लाख १८ हजार १३७ रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र यापैकी फक्त १५ कोटी शेतकऱ्यांना दिले असून केवळ २३ शेतकऱ्यांना हा निधी मिळाला आहे, उर्वरित ८० शेतकरी अजूनही मावेजा पासून वंचित आहेत. उर्वरित निधीच्या मागणीसाठी निवेदनही पाठवण्यात आले आहे.
उपविभागीय तसेच भूसंपादन अधिकारी यांनी १ जुलै २०२० रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी एमआयडीसी मुंबई यांना प्रस्ताव पाठवला आहे, मात्र अद्याप संबंधित कार्यालयाने कोणत्याही प्रकारचा निधी पाठवला नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी सॅनिटायझर पिऊन आत्महत्या करण्यची धमकीच दिली आहे. येत्या २ एप्रिल पर्यंत उर्वरित निधी एक रकमी पूर्णपणे देण्यात यावी अन्यथा शेतकरी सॅनिटायझर पिऊन आत्महत्या करतील, असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनावर अनेक शेतकऱ्यांच्या सह्या सुद्धा घेण्यात आल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- यू ट्यूब घेत आहे नवीन फिचरची चाचणी; कॉपी कंटेंटला बसणार चाप
- “लोगों का काम है कहेना, बेकार की बातों में कहीं बीत ना जाये रैना…”, कोहलीची के.एल. राहुलसाठी बॅटिंग
- परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात केलेली याचिका खोटी आहे का ?
- भाजपा महाराष्ट्रासाठी एक न्याय आणि गुजरातसाठी दुसरा न्याय का लावत आहे ?
- ‘भारतमातेच्या सुपुत्रांच हे बलिदान देशाच्या प्रत्येक पिढीसाठी प्रेरणास्रोत बनून राहील’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

