Share

टीम इंडियाची अनोखी हॅटट्रिक; आयसीसी पुरस्कारात सलग तिसऱ्यांदा मारली बाजी

Published On: 

मुंबई : भारतात सध्य जरी आयपीएलचे वारे सुरु असले तरी टीम इंडियासाठी एक चांगली बातमी आली आहे. आयसीसीचा प्लेअर ऑफ मंथचा मार्च महिन्याचा पुरस्कार हा भारताचा प्रमुख गोलंदाज भुवनेश्वर कुमारला जाहीर झाला आहे. या पुरस्कारावर सलग तिसऱ्यांदा भारतीय खेळाडूनी बाजी मारत अनोखी हॅटट्रिक केली आहे.

आयसीसीने २०२१ या वर्षापासून प्रत्येक महिन्याला सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कार जाहीर करायला सुरुवात केली आहे. जानेवारी महिन्यात हा पुरस्कार भारताचा धडाकेबाज यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतने पटकावला होता. तर फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार हा आर आश्विनने पटकावला होता. आता मार्च महिन्यातील पुरस्कारावर भारतीय संघाचा आघाडीचा गोलंदाज भुवनेश्वर कुमारने पटकावला आहे.

नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेतील कामगीरीसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेत त्याने २२.५० च्या सरासरीने ६ विकेट्स चटकावल्या होत्या. तर टी-२० मालिकेत २८.७५ च्या सरासरीने ४ विकेट्स घेतल्या होत्या. या पुरस्काराच्या स्पर्धेत भुवनेश्वर कुमारसोबत अफगानिस्तानचा क्रिकेटपटू राशिद खान आणि झिम्बाब्वेचा क्रिकेटपटूचा सिन विलियम्स हे दोघे होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!