Share

खाजगी कोवीड सेंटरमधील लुट थांबवा, आ.संतोष दानवे यांचे आवाहन

Published On: 

जालना: जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत असल्याने मोठ्या संख्येत रुग्ण बाधित होत आहेत. सरकारी दवाखान्यात जागा नसल्याने अनेक जण खासगी रुग्णालयात भरती होणे पसंद करीत आहेत. पण, खाजगी रूग्णालयातील कोवीड सेंटरमध्ये कोरोना रुग्णांकडून खाजगी हॉस्पीटलाचे डॉक्टर जास्तीचे बिल आकारून लुट करीत असल्याच्या तक्रारी असून डॉक्टरांनी मानवताधर्म पाळून गरीब व सामान्य जनतेस सहानुभुती पुर्वक सहकार्य व मदत करावी, असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष आ.संतोष दानवे यांनी केले.

जालना शहरासह जिल्हयात कोरोना रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात वाढत आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाने जनतेवर अनेक निर्बंध लावले आहे, सरकारी हॉस्पीटलला कोरोनाची वाढती रुग्णाची संख्या पाहून जालना शहरातील काही खाजगी हॉस्पीटलला कोरोना सेंटर म्हणून जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे.

अशा रूग्णांवर मानवतेच्या दृष्टीकोणातून उपचार करण्याऐवजी, रुग्णांना हिंम्मत देण्याएैवजी त्यांना चुकीची माहीती देवून कोरोनाची टेस्ट न करताच रुग्णांना ॲडमीट करुन नंतर त्यांची कोरोना टेस्ट आल्यानंतर त्यांच्याकडून वाढीव दराने जास्तीचे बील आकारले जात असल्याचे अनेक कोरोना रुग्णांनी तक्रारी केल्या आहेत. सदर बाब गंभीर असून डॉक्टरांनी सुध्दा मानवतेचा धर्म पाळून कोरोना रुग्णांना चांगल्या व उत्तम प्रकारची सेवा उपलब्ध करुन देवून त्यांच्याकडून जास्तीचे बीले न आकारता कोरोना रुग्णांना मानवतेचा धर्म पाळून सहकार्य व मदत करावी, असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष आ. दानवे यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!