टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी ही मागणी मांडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सोमवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. सध्या राज्याच्या दुष्काळ दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांनी आज इंदापूरला भेट दिली. यावेळी शरद पवारांनी शेतकरी कर्जमाफीची मागणी केली.
मी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर लगेच कर्जमाफी करावी, असेही सांगणार आहे. त्याचबरोबर सरकारकडे मोठ्या प्रमाणात धान्याचे साठे आहेत, धान्याची बिलकूल कमतरता नाही. त्यामुळे राज्यात जोवर दुष्काळ परिस्थिती आहे तोवर शासनाने अन्नधान्यांचा दुष्काळी भागात पुरवठा करावा, अशी मागणीदेखील करणार आहे. तसेच अन्नसुरक्षा कायद्यातील नियमाल बदल करुन अशा प्रकारे धान्य पुरवठा करणे शक्य असल्याचेही पवारांनी सांगितले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
