🕒 1 min read
नवी दिल्ली : कोरोनावर मात करण्यासाठी देशातील अधिका-अधिक नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. दिल्लीमध्ये देखील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धास्तावलेल्या जनतेने अनेक ठिकाणी लसीकरणासाठी गर्दी पाहायला मिळत आहे. एकीकडे कोरोनाचा वाढता धोका तर दुसरीकडे लसींचा तुटवडा यामुळे अनेक नागरिक शक्य तितक्या लवकर जाऊन लसीकरण करुन घेत आहेत. पण सध्या देशात सर्वत्र लसीकरणाचा वेग प्रचंड मंदावला आहे.
केंद्र सरकारने दिल्लीला २.६ कोटी लसींचा पुरवठा केला तर पुढील तीन महिन्यात संपुर्ण दिल्लीचे लसीकरण आम्ही पूर्ण करू असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने म्हटले आहे. सध्या दिल्लीत शंभर केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. ही केंद्रांची संख्या २५० ते ३०० पर्यंत वाढवण्याची सिद्धता आम्ही ठेवली आहे असे केजरीवाल यांनी एका संवादात सांगितले आहे. आम्हाला सर्व तुटफूट लक्षात घेऊन तीन कोटी डोसेसची गरज आहे त्यातील ४० लाख डोस आम्हाला आत्तापर्यंत मिळाले आहेत असे ते म्हणाले.
केंद्राने दर महिन्याला ८५ लाख डोस उपलब्ध करून दिले तर आम्ही संपूर्ण दिल्लीचे तीन महिन्यात लसीकरण करू असे ते म्हणाले. आम्ही येथे लसीकरणाची चांगली सोय उपलब्ध करून दिल्याने नॉयडा आणि गाझीयाबाद या उत्तरप्रदेशच्या भागातील नागरीकही दिल्लीत लसीकरणासाठी येत आहेत असे ते म्हणाले.
आता दिल्ली सरकारकडे पुढील पाच ते सहा दिवस पुरेल इतकाच लसींचा साठा असून केंद्राने आम्हाला अधिक लसी पुरवाव्यात असेही त्यांनी नमूद केले. सध्या दिल्लीत रोज एक लाख लोकांचे लसीकरण केले जात असून ते रोज तीन लाखांपर्यंत वाढवण्याची तयारी आम्ही केली आहे. १८ वर्षाखालील मुलांच्या लसीसाठीही पर्यायी व्यवस्था केंद्र सरकार आणि तज्ज्ञांनी करावी असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, दिल्लीमध्ये कोरोनामुळे हालत खूपच बिकट बनली आहे. ऑक्सिजनच्या टंचाईमुळे केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वाद सुरु आहे. आता राज्य सरकारच्याच आमदाराने यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. कोरोनाच्या या लाटेने दिल्लीतील आरोग्य व्यवस्थेची त्रेधा उडविली आहे. लोकांना खूप संघर्ष करून हॉस्पिटलांमद्ये ना बेड मिळत आहे ना ऑक्सिजन. दिल्ली सरकार वेबसाईटवर बेड रिकामे असल्याचे दावे करत आहे, मात्र प्रत्यक्षात रुग्णांच्या नातेवाईकांना अनेक ह़ॉस्पिटलचे उंबरे झिझवावे लागत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- छगन भुजबळांना चूप बसा म्हणत, खुलेआम धमकी देणाऱ्या चंद्रकांत पाटलांवर गुन्हा दाखल करा- समता परिषद
- औरंगाबाद खंडपीठाकडून सहायक पोलीस आयुक्तांचा माफीनामा स्वीकारण्यास नकार
- कोरोना नियंत्रणाबाबत उत्तरप्रदेश सर्वात ढिसाळ राज्य ; हायकोर्टाने मागितले स्पष्टिकरण
- सिटी चौक पोलिसांच्या डोळ्यासमोर सुरू होता ‘व्यापार’; व्हिडीओ व्हायरल झाल्यावर गुन्हा दाखल
- गोव्यात चित्रिकरणाला बंदी केल्यानंतर आता मालिकांचे चित्रिकरण ‘या’ ठिकाणी होण्याची शक्यता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
