टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत प्रत्यक्षपणे सहभाग न घेता राज्यात मनसेने भाजप विरोधात प्रचाराचा धडाका लावला आहे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे ऑडिओ व्हिज्युअल भाषणांद्वारे भाजप नेत्यांना कोंडीत पकडत आहेत. तर आता भाजप नेते देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोलेबाजी करत आहेत.
भाजपचे नेते आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी देखील राज ठाकरे यांना लक्ष केले आहे. केवळ बोलून चालत नाही, कर्तृत्वसुद्धा लागतं, कर्तृत्वाशिवाय तुम्हाला कुणीही मानत नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे. तर नाशिक महापालिका आपल्या हातात होती तेव्हा आपण काय केले ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
महाजन म्हणाले की , राज ठाकरेंच्या सभेला गर्दी होते , पण त्यांच्याकडे निवडून कोणीही येत नाही. त्यामुळे राज यांना आता लावा रे व्हिडीओ एवढंच काम उरले आहे. आपण कुठंय अन् बोलतो कुणाबद्दल, कुठे मोदीजी, कुठे सीएम अशा खरमरीत शब्दात महाजन यांनी राज यांच्यावर तोंडसुख घेतले. तसेच नाशिक महापालिकेत त्यांची सत्ता होती, आता केवळ २ नगरसेवक निवडून आले आहेत. यावरुन लक्षात येईल, केवळ बोलून चालत नाही, कर्तृत्वसुद्धा लागतं. कर्तृत्वाशिवाय तुम्हाला कुणीही मानत नाही, असा घणाघात यावेळी महाजनांनी केला.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

