Share

‘सुप्रिया सुळेंचा पराभव समोर दिसत असल्याने पवारांचे ईव्हीएमकडे बोट’

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा :एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘ज्यांनी कधी जनतेतून निवडणूक लढवली नाही, ते नेते बारामती लोकसभा जिंकण्याची भाषा करत आहेत , त्यामुळे अशा लोकांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने काही गडबड केली आहे का, हि शंका अनेकांना वाटत आहे, असे विधान केले होते.

यालाच उत्तर म्हणून जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी ‘ शरद पवार यांना लेकीच्या पराभवाची चाहूल लागली आहे. त्यांना वाऱ्याची दिशा ओळखता येते त्यामुळे ते आतापासूनच ईव्हीएम मशिनकडे बोट दाखवत आहेत. तसेच पवार बारामतीत जिंकल्यास लोकशाही जिवंत आणि भाजप जिंकल्यास लोकशाही धोक्यात याला काही अर्थ नाही असंही महाजन पुढे बोलताना म्हणाले. ईव्हीएम मशीनमध्ये जर चेद्चाद करता आली तर आमचा ४ राज्यात पराभव झाला नसता असंही महाजन म्हणाले.

दरम्यान, शरद पवारांनी बारामतीतून सुप्रिया सुळे पराभूत झाल्यास लोकांचा लोकशाही वरील विश्वास उडेल असं विधान केलं होतं. त्यावर भाजपकडून चहुबाजूने टीका होत आहे.

https://www.youtube.com/watch?v=ZDYSgivQ3pU

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!