Share

‘ज्याने कधी ग्रामपंचायत निवडणूक लढवली नाही तो खासदारकीची निवडणूक लढवत आहे’

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- राजकारण हा धंदा नाही किंवा घराणेशाही नाही तसेच नातेवाईकांची व्यवस्था करण्याचे ठिकाण नाही. ते त्यागावर आणि समाजकार्यावर उभं असत. ज्याने कधी ग्रामपंचायत निवडणूक लढवली नाही तो खासदारकीची निवडणूक लढवत आहे असं म्हणत पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी पार्थ पवार यांच्यावर तोफ डागली आहे.

शिवसेना, भाजप, रासप, आरपीआय रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम महायुतीच्या मध्यवर्ती कचेरीच्या उद्घाटन प्रसंगी पिंपरीत ते बोलत होते. यावेळी भाजपा शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नसून ती पवार कंपनीने चालवलेली कंपनी आहे अशी टीका देखील बापट यांनी केली.

राष्ट्रवादीची ताकद दिवसेंदिवस संपत चालली आहे. जो आजोबांच्या आणि वडिलांच्या पुण्याईवर निवडणूक लढवत आहे त्याला समाज मान्य करणार नाही.मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी पक्षाने उमेदवारी लादली असून जनता उघड्या डोळ्यांनी पाहात आहे असंही बापट म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!