महूद: राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हल्लाबोल यात्रेचा चौथा टप्पा पश्चिम महाराष्ट्रात सुरु असून दरम्यान, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी शिवसेनेनेवर जोरदार हल्लाबोल चढवला.
शेतकरी एवढा हवालदिल झाला आहे की स्वतःच स्वतःच्या पिकांचे नुकसान करत आहे. या सरकारला शेतकऱ्यांची जाणच नाही. कारण या सरकारमध्ये एकही व्यक्ती शेतकऱ्यांविषयी आपुलकी असलेला नाही. तसेच सध्या सत्तेत असलेले उद्धव ठाकरे कित्येक वेळा म्हणाले की आम्ही सत्तेला लाथ मारू, पण अजून मारलेली नाही. मी उद्धव ठाकरे यांना लाथ मारणारे जनावर भेट देणार आहे. जे शिवसेनेला शिकवेल लाथ कशी मारायची.
एखाद्या शेतकऱ्याला गाय, बैल विकत घ्यायचा असेल तर कॅशलेस व्यवहार कसा करता येईल का ? शेतकऱ्याने काय बैलाच्या शिंगात कार्ड स्वाईप करायचे का ? असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी उपस्थित करून मोदी सरकार आणि शिवसेनेनेवर जोरदार हल्लाबोल चढवला.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

