Share

Gulam Nabi Azad | काँग्रेस पक्ष सोडताच गुलाम नबी आझाद यांनी पुढील राजकीय वाटचालीची केली ‘ही’ मोठी घोषणा

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : सध्या राज्यातील राजकीय वातावरण गढुळ झालं आहे. तसेच काही देशातील झालंं असल्याचं पाहायला मिळतं आहे. अनेक उलाढाली होताना दिसून येतं आहेत. अशताच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस पक्षाचा आणि त्यांच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या राजीनाम्यामुळे काँग्रेस पक्षाचा मोठा धक्का बसला असल्याचं समजतं आहे. त्याचबरोबर त्यांनी एक घोषणा देखील केली असल्याचं समजतं आहे.

गुलाम नबी आझाद यांनी केली एक घोषणा-

तसेच त्यांनी राजीनामा दिल्यानंतर आता गुलाम नबी आझाद भाजप पक्षामध्ये जाणार की आणखी कोणत्या पक्षामध्ये अशा अनेक विषयांवर तर्क-वितर्क केले जात आहेत. अशातच गुलाम नबी आझाद यांनी आपल्या पुढील राजकीय वाटचालीसंदर्भात एक मोठी घोषणा केली आहे.

नव्या पक्षाची स्थापना करणार-

आता मी जम्मू काश्मीरमध्ये परतणार आहे. तसेच तिथे मी माझ्या नव्या पक्षाची स्थापना करणार आहे. मात्र भाजपामध्ये प्रवेश करणार नसल्याचे गुलाम नबी आझाद यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे. माझे विरोधक गेल्या तीन वर्षांपासून मी भाजपामध्ये जाणार असल्याच्या अफवा उठवत आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी मला राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीही बनवून टाकले होते, असं आझाद यांनी म्हटलं आहे.

जुना संबंध तोडण्याचा निर्णय घेतला-

दरम्यान, काँग्रेस पक्ष सोडताना गुलाम नबी आझाद यांनी आपले राजीनामा पत्र नीकाँग्रेस पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठवले आहे.त्या पत्रामध्ये त्यांनी अत्यंत खेदानं आणि अंतः करणानं मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेससोबतचा माझा अर्धशतक जुना संबंध तोडण्याचा निर्णय घेतला असल्याचं नमूद केले होते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!