Share

‘तुमच्या भांडणात शेतकरी मरतोय, तुमच्याकडून सरकार स्थापन होणार नसेल तर…’

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : सेना-भाजप-काँग्रेस आणि राष्ट्रवादी यापैकी कोणीच सत्ता स्थापनेचा दावा केला नसल्याने सध्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. अनेक नेते सत्ता स्थापनेवरून राजकीय पक्षांना सल्ला देत आहेत.

छोटा पुढारी घनश्याम दरोडे या छोट्या पुढाऱ्याने सरकारला लक्ष केलं. सत्ता स्थापनेबाबत बोलताना घनश्याम म्हणाला की, ‘तुमच्याकडून सरकार स्थापन होणार नसेल तर जनतेतून एखादा मुख्यमंत्री बनवा, असा सल्ला यावेळी घनश्यामने राजकीय पक्षांना दिला.

तसेच राज्यात परतीच्या पावसाने बळीराजाच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. शेतकर्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी अनेक नेते मंडळी शेताच्या बांधावर जात आहेत. तसेच यावर पुढे बोलताना तो म्हणाला,’ तुमच्या भांडणात शेतकरी मरतोय, आज याच्याकडे तर उद्या त्याच्याकडे तुमच्या बैठका सुरु आहेत. मात्र हे सर्व दूर ठेऊन आधी सरकार स्थापन करा, असे म्हणत घनश्यामने राजकीय पक्षांना सुनावलं आहे.

दरम्यान, तुम्ही आपापसात राजकारण करत बसू नका. कोणीही या आणि सरकार स्थापन करा आणि लवकरात लवकर शेतकर्यांची कर्जमुक्ती करा, असे तो यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1195167506505158656?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1194991369506279424?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!