लंडन : भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून अयोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत आहे.
अनेक राज्यांमधील अपुऱ्या लस पुरवठ्यामुळे हे लसीकरण थोडं लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. परंतु लस उत्पादक कंपन्यांवरही काही मर्यादा आहेत. यादरम्यान, कोविशिल्ड या लसीचं उत्पादन करणारी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही कंपनी आता देशाच्या बाहेरही लस उत्पादन करण्याच्या विचारात असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतची माहिती सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी दिली आहे.
दरम्यान, सध्या सीरम इस्टिट्यूटचे अदर पुनावाला लंडनला निघून गेले आहेत. मात्र, ‘द टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की मला धमक्या मिळत आहेत, आणि सत्य बोललो तर माझे शीर कापले जाईल, अशीही भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
त्यांनी या मुलाखतीत म्हटलंय की, आपल्या देशातील श्रीमंत आणि मोठ्या मोठ्या राजकीय हस्थींकडून त्यांना या धमक्या येत आहेत. आणि यामुळे ते कोरोना लशीचे उत्पादन लंडन मध्ये करण्याच्या तयारीत आहेत, असं म्हटलं जात आहे. , ‘द टाईम्स’ने याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे. या वृत्तात जगातील सर्वात मोठे लस उत्पादक अदर पुनावाला यांनी म्हटलंय की, फोन कॉल ही सर्वात वाईट गोष्ट आहे. निरंतर येणारे फोन कॉल्स अत्यंत त्रासदायक आहेत.
हे कॉल भारतातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींकडून येतात. भारतीय राज्यांमधील मुख्यमंत्र्यांकडून, व्यवसायिक प्रमुखांनी आणि इतरांनी कोविशिल्ड लशीच्या तत्काळ पुरवठ्याची मागणी केली आहे. धमक्या हा ‘एक अतिरेकीपणा आहे’, असं पूनावाला यांनी म्हंटल आहे. यांतील अपेक्षा आणि आक्रमकतेची पातळी खरोखर अभूतपूर्व आहे. असं देखील आदर पूनावाला पढे म्हणाले आहेत. दुसरीकडे, अलिकडेच गृहमंत्रालयाने सीरम इन्स्टिट्यूटचे CEO अदर पुनावाला यांनी Y सिक्यूरिटी प्रदान करण्याचे आदेश दिले होते. CRPF द्वारे त्यांना ही सुरक्षा देण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- विनाकारण फिरणाऱ्या ८१ नागरिकांपैकी ४ निघाले ‘कोरोना स्प्रेडर’!
- औरंगाबादेत जागृत हनुमान संस्थानचा सकारात्मक पुढाकार, कोरोना रुग्णांसाठी उघडले मोफत कोविड सेंटर!
- लसी येताच पैठणच्या कोरोना लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी, फिजिकल डिस्टन्सिंगचा पुर्ता बोजवारा !
- केंद्रसरकारवर वारंवार टीका करत बसण्यापेक्षा राज्यसरकारने लस का बुक केली नाही? – आ. लोणीकर
- आजपासून १८ प्लससाठी पाच केंद्रावर पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत लसीकरण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

