औरंगाबाद : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने येणारा काळ हा अतिशय महत्त्वाचा आहे. वैजापूर मतदार संघ पक्षासाठी नेहमीच महत्त्वाचा राहिला आहे. त्यानुसार निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागा. जोमाने पक्षाचे काम केल्यास विजय आपलाच राहील असा विश्वास जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी वैजापुर येथे कार्यकर्त्यांना दिला.
यावेळी जयंत पाटील म्हणाले, वैजापूर हा मतदारसंघ पक्षासाठी महत्वाचा आहे. यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करायला हवे, असे आवाहन पाटील यांनी केले. तसेच २०२४ मधील निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी पाटील यांनी इथल्या कार्यकर्त्यांना साकडे घातले. वैजापूरमध्ये भाऊसाहेब चिकटगावकर यांच्या पाठीशी राहा. तर नक्कीच वैजापूर येथे पक्षाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही.
आपल्याला पक्ष संघटनेकडे जास्त लक्ष द्यावे लागेल. पुढील काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नजरेसमोर ठेवून त्यासाठीची तयारी आतापासूनच करायला हवी, असे मत त्यांनी व्यक्त केले. या बैठकीला राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, मराठवाडा संपर्क प्रमुख जयसिंगराव गायकवाड, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- १ ऑक्टोबरपासून बँकेतील नियमासह ‘या’ पद्धतीत होणार बदल
- पायातून रक्त वाहत असतानाही सीएसकेचा ‘हा’ खेळाडू मैदानावरून हटला नाही; फोटो व्हायरल
- ‘हे आंदोलन राजकीय नाही’; आंदोलनात घुसणाऱ्या कॉंग्रेस नेत्याला शेतकऱ्यांनी दाखवला घरचा रस्ता
- ‘ऊसतोड कामगार हा राजकारणाचा विषय नव्हेच, श्रेयासाठी मी काम केले नाही!’, पंकजांचा धनंजय मुंडेंना अप्रत्यक्ष टोला
- राज्यसभा पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड झालेल्या रजनी पाटील यांचे चंद्रकांतदादांनी केले अभिनंदन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
