बुलडाणा : चिखली येथील अत्याचार प्रकरणातील फरार असलेल्या नराधमाला तत्काळ गजाआड करावे. तसेच वृत्त संकलन करण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला पोलिसांकडून झालेल्या दमदाटी प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजप आमदार श्वेता महाले यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. तसेच राज्यात महिलांवर सातत्याने होणाऱ्या अत्याचाराबाबत दोषी असणाऱ्या गुन्हेगारांना कडक शिक्षा मिळावी यासाठी प्रस्तावित शक्ती कायद्याची अंमलबजावणी तातडीने करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
आमदार श्वेता महाले यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची गुरुवारी मंत्रालयात जाऊन भेट घेतली. भेटीमध्ये आमदार महाले यांनी सांगितले की, चिखली येथील माळीपुरा भागातील १६ वर्षीय मुलीचा २० ऑगस्ट रोजी वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त जालना येथील तिच्या बहिणीचा पती चिखलीत आला व तिला गिफ्ट घेवून देतो, असे म्हणून तिला दुचाकीवर घेवून गेला. गिफ्ट घेतल्यानंतर जावयाने घरी न सोडता दुचाकी मेहकर फाट्याकडे वळवली व शिवाजी उद्यानामागील असलेल्या आधीपासूनच उभ्या असलेल्या कारमध्ये तिचे तोंड दाबून कारमध्ये टाकले व कार जालन्याकडे पळविली. यावेळी जावयाने प्रथम कारमध्येच मेहुणीवर लैंगिक अत्याचार केला.
हे प्रकरण गंभीर व संवेदनशील असतानाही अद्यापही गुन्हेगाराला अटक झालेली नसल्याने जनतेमध्ये तीव्र स्वरूपाचा असंतोष पसरत आहे. तसेच १४ सप्टेंबर रोजी चिखली शहरात स्थानिक गुन्हे शाखेकडून हॉटेल अमृततुल्य जवळ ८८ किलो गांजा पकडण्यात आला. त्यावेळी या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सदरचे वृत्त संकलित करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी लोटपाट, दमदाटी करून त्यांच्या हातून मोबाइल हिसकावून वृत्त संकलनासाठी घेतलेले फोटो डिलीट करण्यात आले. पोलिसांनी त्यांच्यावर मनमानी पद्धतीने अरेरावी करून वृत्तसंकलन करू दिले नाही. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करून भविष्यात अशा घटना होणार नाही याबाबत उपाययोजना करण्याची मागणी आमदार महाले यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ठाकरे सरकारने निवडणुका रोखून दाखवाव्यात’, ओबीसी आरक्षणावरून बावनकुळे यांचे आव्हान
- ‘बाबासाहेबांनी स्थापन केलेली रिपब्लिकन पार्टी जिवंत राहिली तरच दीन दुबळ्यांना न्याय मिळेल’
- गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकांना परवानगी, राज्य शासनाचे आदेश
- ‘..आता कोथळा काढायची भाषा केली जाते!’, शरद पवारांचे महाराष्ट्रातल्या परिस्थितीवर भाष्य
- ‘महाराष्ट्रात कोरोना पॉझिटिव्हिटी दर हळूहळू वाढत आहे’, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
